आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी हवालदिल:दानापूर येथील जुई धरणात केवळ 36.81 टक्के जलसाठा शिल्लक ; शेतकऱ्यांत चिंता

दानापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील दानापूरच्या जुई धरणातून भोकरदन शहरासह तालुक्यातील पंचवीस गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या व हजारो हेक्टर जमिनीला रब्बी पिकांसाठी पाणी पुरविणाऱ्या धरणात सध्या ३६.८१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने जलसाठ्यात झपाट्याने घट होताना दिसत आहे.

हे धरण २३६ हेक्टर बुडित क्षेत्रात बांधण्यात आले आहे. या धरणाची बांधणी १९५८ मध्ये सुरू होऊन १९६४ मध्ये या धरणाचे काम पूर्ण झाले होते. हे धरण व्हावे, म्हणून बाभूळगाव येथील माजी मंत्री कै. भगवंतराव गाढे यांच्या पुढाकाराने झाली होती. या वर्षी पाणी पातळीत वाढ झाली नसल्याने पाणीटंचाईस सामोरे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यंदा परिसरात पर्जन्यमान कमी प्रमाणात झाल्यामुळे धरणात पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झाली नसल्यामुळे आगामी काळात भोकरदन शहरासह २५ गावांना पाणी टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या धरणातून भोकरदन शहरासह दानापूर, देहेड, मूर्तड, सुरंगळी, वाडी, कठोरा बाजार, वाकडी, कुकडी, कारजगाव, कल्याणी, सिपोरा बाजार, रेलगाव, बाभूळगाव, विरेगाव, भायडी, तळणी, पिंपळगाव रेणुकाई, रामेश्वर कारखाना, दगडवाडी आदी गावांना पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान, यावर्षी पाणी कमी प्रमाणात झाल्याने जुई धरणात पाणी पातळीत वाढ झाली नसल्यामुळे भोकरदनसह शहरासह इतर गावांना पाणी टंचाईस सामोरे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. धरण परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी चोरी करू नये यासाठी उपाय योजना करणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थ सय्यद नदीम यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...