आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय स्पर्धा:ज्युनियर, सीनियर टेिनस बॉल क्रिकेट स्पर्धा चाचणी

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व परभणी जिल्हा टेनीस बॉल क्रिकेट असोसीएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते ८ नोंव्हेबर २०२२ दरम्यान परभणी येथे ९ वी मिनी सबज्युनियर (१४ वर्षांआतील) व १० व्या सीनियर राज्यस्तरीय टेनीस बॉल क्रिकेट स्पर्धा होत आहे.

या स्पर्धेसाठी जालना जिल्हा टेनीस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या ४ नोव्हेंबर शुक्रवारी देवगिरी इंग्लिश स्कुल जालना येथे सकाळी १० वाजल्यापासुन निवड चाचणीचे आयोजन करण्यात आलेले आहे. निवड चाचणीमधुन मिनी सब ज्युनीयर गटासाठी १४ मुले व १४ मुलीं तसेच सिनीयर करीताही १४ मुले व १४ मुलींची निवड करण्यात येणार आहे.

निवड चाचणीमध्ये सहभागी होण्याकरीता केाणतेही नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नसुन खेळाडुचे वय मिनी सब ज्युनीयर करीता १४ वर्षाच्या आत व जन्मतारीख १/१/२००९ च्या नंतरची असणे आवश्यक आहे. तसेच सिनीयरसाठी वयाची कोणतीही अट नाही. अधिक माहीतीसाठी जिल्हा संघटनेचे सचिव शेख चाँद पी.जे, किरण पाटील, जयकुमार वाहुळे, मंगेश सोरटी, नितीन जाधव, संतोष वाघ, शेख ईस्माईल, वेदांत सोरटी, शेख समीर, सोहेल खान, पवन दांडगे, शैलेश मोरे यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून अधिक माहिती जाणून घ्यावी. दरम्यान, या निवड चाचणीमध्ये जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडुंनी सहभागी व्हावे असे आवाहन जालना जिल्हा टेनीस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अमजत पठाण, देवगिरी विद्या प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बबन सोरटी यांच्यासह आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...