आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठा गौरीं:ज्येष्ठा गौरींचे टेंभुर्णीत उत्साहात आगमन, सजावटीने वेधले लक्ष

टेंभुर्णी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी व परिसरात जेष्ठा गौरींचे उत्साहात आगमन झाले. घरोघरी विविध प्रकारची आरास करण्यात आली. रविवारी गौरीचे भोजन करण्यात आले. यासाठी मिष्ठांनासह विविध प्रकारच्या १६भाज्यांचा नैवेद्य गौरीला दाखवण्यात आला.

येथील कारागीर रमेश इंगळे यांच्या घरीही आकर्षकरित्या गौरीची सजावट करण्यात आली. काठीवर साडी नेसून तयार केलेल्या गौरींना पाहण्यासाठी महिलांनी गर्दी केली. एकीकडे तयार गौरींचे मुखवटे मिळत असताना ग्रामीण भागात आजही वेगवेगळे आयुध वापरून ज्येष्ठा गौरी बनविल्या जातात. विशेषता केळीच्या पानावरील ज्येष्ठा गौरी यामध्ये असते. मागील अनेक वर्षापासूनची परंपरा असलेल्या जेष्ठा गौरींच्या आगमनाची यावर्षीही मोठ्या हर्षोल्लासात साजरी होत आहे. यासाठी महिलांची आठवडाभरापासून तयारी सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...