आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाला हा मानवी जीवनासाठी एक अमृतच आहे. जो काला घेण्यासाठी भगवंताला मत्स्य अवतार घ्यावा लागला. तरीसुध्दा तो भगवंताला मिळाला नाही. ब्रम्हदेवाला न मिळालेला काला तुम्हा आम्हाला मिळतो आहे, त्याचे महत्त्व समजले पाहिजे, असे बबन महाराज हांडीकर यांनी सांगितले.
मंठा तालुक्यातील तळणी येथे सुरु असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहातील काल्याचे कीर्तनात महाराजांनी विश्वाचा जनीता म्हणे यशोदेशी माता ऐसा भक्तांचा अंकीत लागी तैसे लावी प्रीत या अभंगावर निरुपन केले. काला फक्त भूतलावर भारतात आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे त्यामुळेच या भूमीवर नामस्मरणाचे अध्यात्माचे पेव आहे भक्ती ही निस्वार्थ असावी त्यामध्ये कुठलाच स्वार्थ नसावा. गवळणीची भक्ती जशी भगवान श्रीकृष्णावर होती. त्यामुळे परमात्मा त्याच्या हाकेला धावून जात. सत्य युगातील राजा हरिश्चद्राची साठ हजार वर्षाची तपश्चर्या केली तेव्हा देव भेटला त्यासाठी त्याग निष्ठा व समर्पण व ईच्छा शक्ती असणे गरजेचे आहे.
आजच्या युगातील भक्ती ही नाटकी व स्वार्थी आहे. मनुष्यावर संकट आली की तो भगवंताचा धावा करू लागतो. नामस्मरणच मानवी जीवनास तारु शकते. नामाने वासना क्षीण होत जातात हा तर अनुभव आहे. हे जरी खरी असले तरी देह सोडण्याच्या समयी नामाखेरीज कशाचेही स्मरण राहू नये. बायको आजारी पडली तर राञ दिवस जागतो आणि स्वःत ला विसरतो मग भगवंताकरिता नाही का. नामस्मरणाची तळमळ असली पाहिजे मग सर्व काही होते ज्या क्षणी भगवंत स्मरणात स्वःत:ला विसराल त्या क्षणी मुक्ती मिळेल त्यासाठी साधना आणि त्याग या दोन गोष्टी करणे गरजेच आहे. स्वःतला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे. चांगले कार्य सुध्दा बंधनांला कारणीभूत होत असते.
याकरिता कोणतेही कृत्य भगवंताला स्मरुण केले पाहिजे. जो काळ भगवंताच्या स्मरणामध्ये जातो तोच काळ सुखात जातो. विषयासाठी आपण स्वतःला विसरतो मग भगवंताला आठवण्यात का नाही स्वत: ला विसरू. ही प्रवृत्ती ज्या वेळेस मनुष्याची होईल त्या वेळी त्याला भगवंताची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. सद्यस्थितीत मनुष्य जीवनास तरायचे असेल तर रामकृष्ण हरी मंञ हा सदैव स्मृतीत ठेवा. त्या मंञाचे मनुष्याने सतत नामस्मरण केले तर तुम्हाला आयुष्यात कमी पडणार नाही. जो मनुष्य ब्रम्हांडाच्या मालकाचे स्मरण करतो त्याला कुठल्याच गोष्टी कमतरता पडणार नाही. मनुष्यानी संतांनी घालून दिलेल्या मार्गावर मार्गक्रमण करणे गरजेचे आहे.तळणी येथे गेल्या २५ वर्षापासुन या अंखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन उध्दव महाराज यांच्या पुढाकाराने ग्रामस्थ करतात. सप्ताहात साथ संगत संत नेमीनाथ महाराज संस्थानचे विद्यार्थी तसेच अर्जुन महाराज बादाड, विष्णू महाराज बादाड, जनार्धन सरकटे, भगवान महाराज सरकटे, शालीकराम टेकाळे, पांडूरंग नाके, रामदास गुडघे आदींनी परिश्रम घेतले.
प्रत्येकाने किमान एक तरी गाय पाळावी श्रीकृष्ण परमात्माचे गाईवर नितांत प्रेम होते. परंतु आज त्याच गाईचा छळ होतोय. धर्मावर आलेले ते एक प्रकारचे संकटच आहे. प्रत्येकाकडे एक तरी गाय असावी तिची सेवा केल्यास भगवतांच्या सेवेचे समाधान लाभते. पाश्चिमात्य संस्कृतीचा शिरकाव धर्मासाठी हानीकारक आहे. तो वेळीच दाबल्या गेला पाहिजे. तरुण मुलांमध्ये दारु पिऊन नाचण्याचे प्रमाण वाढले आहे. दारू पिऊन नाचण्यापेक्षा काल्याच्या किर्तनात येवून नाचा. भगवंत नक्कीच आशीर्वाद देईल. आई वडीलांची सेवा करा, निर्व्यसनी राहून नामस्मरण करा तरच या कलयुगात तुमचा टिकाव लागेल. आपली संस्कृती खूप चांगली आहे ती टिकली पाहिजे. ती टिकली तरच आपण टिकू, असे महाराजांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.