आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटीतटीचा सामना:सत्यशोधकचे कबड्डीपटू विभाग पातळीवर

भोकरदन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित जालना जिल्हा क्रीडा स्पर्धा २०२२-२३ मध्ये मानव विकास व पूर्णनिर्माण संशोधन संस्था औरंगाबाद संचलित भोकरदन तालुक्यातील गोषेगांव येथील सत्यशोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १९ वर्षीय मुलींचा कबड्डीचा संघ अंबड विरुद्ध भोकरदन असा झालेल्या सामन्यात विजयी होऊन जिल्हास्तरावर पहिल्या क्रमांकावर आला.

संघाची कॅप्टन सोरमारे, जयश्री रावसाहेब, मोहिते वैशाली दिलीप, रोकडे निकिता भगवान मोहित दीपाली गंगाधर, लेकुरवाळे मयूरी विजय, मोहिते वैष्णवी रमेश, पवार अश्विनी समाधान, सय्यद सायमा बिस्मिल्ला, मोहिते पूनम गजानन, शीतल मोहिते हे खेळाडू सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे रेडर पूनम, जयश्री आणि डिफेडर मयुरी यांच्या उत्कृष्ट खेळीमुळे अटीतटीच्या अंतिम सामन्यात विजयी झाल्यामुळे या संघाची विभागीय स्तरावरील कबड्डी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. त्याचप्रमाणे भोकरदन विरुद्ध जाफराबाद या १४ वयोगटातील सामन्यात विद्यालयातील १४ वयोगटातील मुलींच्या संघानी जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला.

स्पर्धेचे उदघाटन आमदार कैलास गोरंटयाल यांच्या हस्ते झाले. संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य सुनीलजी वाकेकर संस्थेच्या सचिव जयश्रीताई बनकर, श्री अरविंद विद्यासागर जिल्हा क्रीडा अधिकारी जालना, क्रीडा मार्गदर्शक एम. झेड. शेख, संतोष वाबळे, जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोदिनी येथील प्रमोद खरात भोकरदन येथील क्रीडा संयोजक जंजाळ, सह्यायक किरण साळवे, नवगिरे, संदीप चंन्द्रे यांच्या सह विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी , विद्यार्थी, गावकरी यांनी संघाचे अभिनंदन केले व मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. क्रिडा शिक्षक गोविंद शिंदे, नंदकिशोर मापारी, रामेश्वर खेडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...