आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघ प्रथम‎:आविष्कार महोत्सवात कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाचा संघ प्रथम‎

सोनपेठएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कै.रमेश वरपुडकर‎ महाविद्यालयाने आविष्कार महोत्सवात प्रथम आणि‎ द्वितीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाची गुणवत्ता‎ कायम राखली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा‎ विद्यापीठ नांदेड व बी.रघुनाथ महाविद्यालय परभणी‎ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परभणी येथे‎ महोत्सवाचे आयोजन केले होते. महाविद्यालयाने‎ आपल्या पाच संशोधन प्रकल्पांचे उत्कृष्ट‎ सादरीकरण केले.

मानव्यविद्या शाखेतून‎ महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचा “शॉर्टन्ड फॉर्म‎ ऑफ इंग्लिश इन सोशल मीडिया” हा संशोधन‎ प्रकल्प प्रथम क्रमांक तर वाणिज्य, व्यवस्थापन व‎ विधी शाखेतून लोकप्रशासन विभागाच्या “इलेक्ट्रिक‎ मतदान यंत्राद्वारे होणाऱ्या निवडणुका : एक‎ चिकित्सक अभ्यास” या प्रकल्पाने द्वितीय क्रमांक‎ पटकावला. गीता कदम, वर्षा ढेंबरे, सानिका कदम,‎ वैष्णवी शिंदे, दुर्गा खंदारे, नेहा बागल, अनुराधा‎ बोचरे, समीक्षा भोसले, निकिता शिंदे, शुभांगी कदम‎ या विद्यार्थिनींनी सादरीकरण केले. त्यांचे‎ महाविद्यालयाच्या वतीने स्वागत केले गेले.‎

बातम्या आणखी आहेत...