आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांची गर्दी:वाढोण्यातील कालिका देवी मंदिर परिसर हिरवाईने नटला

धावडा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजिंठा ते बुलडाणा महामार्गांवरील वाढोना, टिटवीच्या मध्यभागी असलेल्या कालिका देवीचे मंदिर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गुहेमध्ये देवीची मुर्तीची स्थापना केलेली आहे. या ठिकाणी नैसर्गीक वातावरण असून सध्याच्या सततधार पावसामुळे डोंगर परिसराला हिरवी चादर निर्माण झाली आहे.

भोकरदन तालुक्यात आलेले हे डोंगराळ भागात आहे. सध्या या हिरवाईचा आनंद तसेच मंदीरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी होत आहे. तसेच पडत असलेल्या पावसामुळे झाडे, डोंगर, लघुपाटबंधारे भरले असून कालिका देवी मंदिर परिसरात आनंद घेण्यासाठी भोकरदन तालुक्यासह मराठवाडा, खान्देश, विदर्भातील पर्यटक गर्दी करतात. मंदिर परिसरात वाहत असलेल्या ढबढब्याच्या पाण्यामध्ये पर्यटक पोहण्याचा आनंद घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...