आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयत्न फसला:कालिका स्टील कंपनीचे 36 लाख 43 हजार काढण्याचा प्रयत्न फसला

जालना25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अज्ञाताने बँकेस बनावट ई-मेल पाठवून व त्यात कंपनीचे चेक बुक संपल्याचे नमूद करून कालिका स्टील कंपनीच्या खात्यातून ऑनलाइन ३६ लाख ४३ हजार १४८ रुपये काढण्याचा प्रयत्न फसल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी आदित्य रमाकांत अंभोरे (ढवळेश्वर, जालना) यांच्या फिर्यादीवरून संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औद्योगिक वसाहतीतील कालिका स्टील कंपनीचे पुणे शहरातील शिवाजीनगर येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत खाते आहे. मंगळवारी एका अज्ञात आरोपीने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कंपनीच्या नावाने सही व स्टॅमसह कंपनीचे मालक घनश्याम गोयल यांच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार केला. त्यावरून बँकेला ई-मेल पाठवून चेक बुक संपल्याचे सांगितले. त्यानंतर कंपनीच्या खात्यातून ऑनलाइन ३६ लाख ४३ हजार १४८ रुपये काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, बँकेने कंपनीशी संपर्क केल्याने ही बाब उघड झाली. याप्रकरणी आदित्य रमाकांत अंभोरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचण हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...