आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:अंतरिक्ष परीक्षेत परतूरचे कार्तिक, पूनम अव्वल‎

जालना‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद शाळांतील इयत्ता पाचवी‎ ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अंतरिक्ष केंद्र‎ श्रीहरीकोटा आंध्र प्रदेश येथे उपग्रह‎ प्रक्षेपणाचा प्रत्यक्ष अनुभव, थंुंबा येथील‎ स्पेस म्युझियम, विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल‎ अँड टेक्निकल म्युझियमचा प्रत्यक्ष‎ अनुभव देण्यासाठी जिल्ह्यातून २४‎ विद्यार्थ्यांना पाठवले जाणार आहे.‎ जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या‎ चाचणीतून २४ जणांची निवड झाली‎ आहे.

यामध्ये परतूरचे कार्तिक‎ रामेश्वर दिरंगे, पूनम लक्ष्मण भुंबर हे दोघे‎ जिल्ह्यात सरस ठरले.‎ शालेय विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक‎ दृष्टिकोन, संशोधनवृत्ती विकासासाठी‎ अंतरिक्ष केंद्र, उपक्रम प्रक्षेपण आदी‎ बाबींचा अनुभव घेता यावा यासाठी‎ प्रत्येक तालुक्यातील तीन अशा‎ जिल्ह्यातील २४ विद्यार्थ्यांना पाठवले‎ जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात‎ केंद्रांतर्गत इयत्ता ५ वी ते ८ वी वर्गात‎ शिकणाऱ्या जि.प.च्या शाळांतील सर्व‎ विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. गणित‎ तसेच विज्ञान या विषयावर आधारित‎ परीक्षा घेतली. जिल्ह्यात सर्वोत्तम‎ गुणवत्ता धारण करणारे तालुक्यातून तीन‎ अशा २४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.‎ यासाठी डायट तसेच समग्र शिक्षा‎ अभियान यांच्याकडून निवडीसाठी‎ नियोजन पाहिले.‎

बातम्या आणखी आहेत...