आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकतंत्र:लोकतंत्र के नाम पर कवितेला द्वितीय क्रमांक

भोकरदन8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मोरेश्वर महाविद्यालयाने नुकत्याच, विद्यापीठात ऑक्टोबर २०२२ मध्ये संपन्न झालेल्या केंद्रीय युवक महोत्सवात घवघवीत यश संपादीत केले अाहे. काव्यवाचन या प्रकारात महाविद्यालयाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे युवक मोहत्सव प्रमुख प्र.ा दिनेश हंगे यांनी दिली.

काव्य स्पर्धेत सिमा शकुर शेख या एम.एस्सी.द्वितीय वर्षातील विद्यार्थिनीने “ लोकतंत्र के नाम पर “ ही स्वरचित हिंदी कविता सादर केली.त्यात लोकशाहीचे दार्शनिक स्वरूप आणि तळ वास्तवता याचे दर्शन तसेच लोकशाहीच्या नावावर घटित होणाऱ्या कटू सत्य घटनेचा पाढाच तिने वाचला. यात तिने द्वितीय क्रमांक पटकावला.

तिच्या यशाबद्दल मोरेश्वर संस्थेचे सचिव केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे, निर्मला दानवे, आशा पांडे, प्राचार्य. डॉ.भगवान डोंगरे, डॉ. दिनेश हंगे, प्रा. कवित्रा वळवी, डॉ. सुरेखा जैस्वाल, मराठी विभाग प्रमुख डॉ.गोवर्धन मुळुक, डॉ.सतीश ढोके, डॉ.आसाराम बेवले, डॉ.दिगंबर खरात, डॉ. विठ्ठल गायकवाड, प्रा.जगदीश भगत, गीता पिसे, सुजाता पगारे,अश्विनी रोजेकर, सपना काळोखे,निकिता मिसाळ, रेणुका गवळी, आरती आक्से, करिश्मा चव्हाण, राजश्री गिरी यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...