आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्याच्या संशयावरून मायलेकीचा खून:पती, सवतीसह तिचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात; जालन्यातील घटना

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चारित्र्यावर संशय घेत पती, सवत व तिच्या मुलाने मारहाण करून मायलेकीचा खून केल्याची घटना जालना शहरातील सोनलनगर भागात सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. भारती गणेश ऊर्फ संजू सातारे (३६), वर्षा सातारे (१७) अशी मृत माय-लेकींची नावे आहेत.

याप्रकरणी मृत भारती सातारे यांची बहीण पंचशीला पांडुरंग कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, मृत भारती सातारे आणि मुलगी वर्षा सातारे यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन गणेश ऊर्फ संजू सातारे, सवतीसह तिचा १६ वर्षांचा मुलगा या तीन जणांनी मारहाण केली होती. १५ दिवसांपासून व काल रात्रभर सुरू असलेल्या या मारहाणीतच त्या दोघी मायलेकींचा मृत्यू झाला. मृत भारती ही गणेश सातारे याची दुसरी पत्नी होती. तिचे पूर्वी लग्न झालेले होते. पहिल्या पतीपासून तिला दोन मुली झालेल्या असून, एकीचे लग्न झालेले आहे, तर दुसरी मुलगी मृत वर्षा ही होती.

मृत भारती यांचे गणेश सातारे याच्यासोबत लग्नापूर्वीपासूनच प्रेमसंबंध असल्याचे समजल्याने त्यांच्यापासून पहिल्या पतीने १५ वर्षांपूर्वीच काडीमोड घेतला होता. त्यानंतर गणेश सातारे याने भारती यांच्यासोबत लग्न करून त्यांची दुसरी मुलगी वर्षा हिचा स्वीकार केला होता. भारती यांना गणेश सातारे याच्यापासून झालेला एक मुलगा असून, तो आठ वर्षांचा आहे. आरोपी गणेश ऊर्फ संजू सातारे, त्याची पहिली पत्नी व तिचा १६ वर्षांचा मुलगा अशा तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेहमी होत होती मारहाण
पंधरा दिवसांपासून नेहमी मारहाण होत होती. एके दिवशी रेल्वेस्टेशनकडेही मृत महिलेस मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

बातम्या आणखी आहेत...