आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही, जी मनुष्य साध्य करू शकत नाही. त्यासाठी शिक्षणासोबतच वर्तणूक चांगली ठेवणे गरजेचे आहे यश नक्की मिळेल, असे प्रतिपादन येथील शिल्प निदेशक गणेश वाघमारे यांनी केले.अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील यशवंतराव चव्हाण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विजतंत्री व तारतंत्री विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्राचार्य एस. डी. लिमकर, रोहिदास पवार, पवन पवार, अकबर पिंजारी, राजेंद्र पवार, किर्तीनंद गांगुर्डे उपस्थित होते. वाघमारे म्हणाले, ऑनलाईनच्या युगात कोणतेही काम मन लावून करावे. आयटीआय विद्यार्थ्यांनी काळाची पाऊले ओळखून व्यावसायाचा दृष्टिकोन बदलायला हवा विजतंत्री, तारतंत्री विद्यार्थ्यांनी नोकरीच्या पाठीमागे न धावता आयटीआय च्या ब्रिद वाक्य “ मी नोकरी मागणारा न होता नोकरी देणारा होणारा ’ प्रमाणे गुत्तेदारीचा परवाना शासकीय नियमानुसार हस्तगत करावा. फक्त आपण जे काही ध्येय स्वतःसाठी पाहत आहोत ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजे. आपण आपल्या ध्येयासाठी सतत प्रयत्न करत असाल आणि न थांबता आणि धैर्य न गमावता प्रयत्न करत असाल, तर एक नवीन दिवस नक्कीच यश प्राप्त होईल. सुत्रसंचालन रमेश सुरवसे यांनी, तर नवनाथ विधाटे यांनी आभार मानले. यावेळी मच्छिंद्र दुफाके, संतोष मस्के उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.