आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविविध आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी व विविध राजकीय पक्ष, संघटनांनी एकीकडे कृषिपंपांचा मध्यरात्री एक नंतरची वीज येण्याची वेळ शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. शिवाय त्यांच्या जीवाशीही खेळण्याचा प्रकार असून, त्यात बदल करण्याची मागणी केली होती. मात्र,संबंधित मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. दिवसा दहा तासांचा वीस पुरवठा करावा, अशी मागणी असताना वीज कंपनीने या उलट १ डिसेंबर पासून नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. १ डिसेंबरपासून वीजपुरवठ्याच्या बदललेल्या वेळा महावितरणने जाहीर केल्या असून, या वेळा म्हणजे शेतकऱ्यांसाठी ‘दिवसा ताप आणि रात्री मनःस्ताप’ अशीच म्हणण्याची वेळ आली आहे.
मध्यरात्री एकनंतरची वीज येण्याची वेळ शेतकऱ्यांसाठी त्रासदायक तर आहेच; शिवाय त्यांच्या जीवाशीही खेळण्याचा प्रकार असून त्यात बदल करून सरसकट दिवसा १० तास कृषिपंपांना वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. महावितरणचे हे लोडशेडिंग वेळापत्रक चक्क शेतकऱ्यांच्या मुळावरच उठले आहे.अनेक संघटनेच्या माध्यमातून राज्यातील विविध भागात महावितरण कार्यालयासमोर अनेकवेळा आंदोलनेही झाली आहेत.या शिवाय विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील आंदोलने केली आहेत त्यानंतरही या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षदा लावल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.
आजही शेतकऱ्यांना मध्यरात्रीच्या वेळेस पिकांना पाणी देण्यासाठी जाताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी आता जोर धरत आहे. शेतकऱ्यांबरोबरच इतर संघटनांकडून शेतकऱ्यांकडून किमान सोमवार ते गुरुवार पहाटे ५ ते दुपारी १ तसेच शुक्रवार ते रविवार सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत वीजपुरवठा करण्याची मागणी एकीकडे होत असताना महावितरणने परंतु तर दुसरीकडे लोडशेडिंग असूनही दिलेल्या आठ तासांच्या कालावधीत विजेचा चालणारा लपंडाव तो वेगळाच. त्यावेळी तर शेतकऱ्यांना शेती ते मोटर पंपापर्यंतच्या येरझाऱ्या करताना पुरती दमछाक करावी लागणार आहे.
रात्री १ वाजता वीजपुरवठा
डिसेंबर महिन्याचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये मध्यरात्री १.०५ ते सकाळी ९.०५ आणि सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० अशी वेळ निश्चित केली आहे. मात्र ही वेळ जीव मुठीत धरून रातपाळीची आहे. असे असताना साप, विंचू, गवे, बिबट्या,लांडगे यांसारख्या रानटी व हिंस्र प्राण्यांचा वावर शिवारात असताना शेतकऱ्यांना रात्रभर पिकांना पाणी देण्यासाठी शेतातच ताटकळावे लागणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.