आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा रत्न गौरव:खंदारकर यांची महाराष्ट्र क्रीडा रत्न गौरव पुरस्कारासाठी निवड

सिंधी काळेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कला क्रीडा दूत फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय “महाराष्ट्र क्रीडा रत्न गौरव पुरस्कार २०२२” साठी औरंगाबाद विभागातून जालना जिल्ह्यातील नेर येथील जिल्हा परिषद प्रशालेचे क्रीडा शिक्षक उमेशचंद्र काशीनाथराव खंदारकर यांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्रातील पारंपरिक खेळात विशेष कार्य करणाऱ्या क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक यांना एका विभागातून एक याप्रमाणे मूल्यांकन गुणांनुसार हा पुरस्कार दिला जातो. विद्यार्थ्यांना विविध खेळांचे मार्गदर्शन करून त्यांच्याकडून सतत सराव करून घेणे, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर शालेय क्रीडा स्पर्धेत अनेक पदक मिळविणारे अनेक खेळाडू घडविल्याबद्दल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नावलौकिक केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. याबद्दल भागवत उफाड, सरपंच पाईकराव, जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे सचिव चांद शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, मुख्याध्यापक श्रीकांत गायकवाड, वाय. पी. दसपुते, टी. पी. काकडे, संभाजी राऊत आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...