आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साजरा:खंडोबा महाराज यात्रोत्सव विविध उपक्रमांनी साजरा

भोकरदन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री खंडोबा महाराज यांचा यात्रोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर साखळदंड तोडण्यात आला. याशिवाय रात्री वाघ्या मुरळीचा कार्यक्रम झाला. यादरम्यान भाविकांनी येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करीत वातावरण दुमदुमून टाकले होते. दरवर्षी भरणाऱ्या या यात्रेसाठी दूरवरून भाविक येथे येत असतात. यावर्षी देखील भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

यावेळी रांगोळ्यांच्या पायघड्यांनी सजलेले मंदिराचे प्रवेशद्वार , फुलांची सजावट अन् विद्युत रोषणाई, पारंपरिक पद्धतीने केलेले धार्मिक विधी अन् उपक्रम, भाविकांनी दर्शनासाठी केलेली गर्दी अन् महाप्रसादाचा भाविकांनी घेतलेला लाभ असे भक्तिपूर्ण शहरातील श्री खंडोबा मंदिरांमध्ये पाहायला मिळाले. जुन्या बाजारपट्टी जवळील श्री खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्सव उत्साहात साजरा केला. चंपाषष्ठीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच खंडेरायाच्या जय घोषात भंडाऱ्याची चोहिकडे उधळण झाल्याने मंदिराचा परिसर पिवळ्या रंगाने नटला होता. मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर उजळले होते. मंगळवारी लंगर (साखळदंड) तोडण्यात आले. ठिकठिकाणी वाघ्या मुरळीचे कार्यक्रम सुरू होते. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर डाळ्या रेवड्याची दुकाने मोठया प्रमाणात थाटण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...