आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप हंगाम:आष्टी परिसरात पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात, महिन्यापासून दडी

आष्टीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परतूर तालुक्यातील आष्टी येथील मंडळात पावसाने तब्बल एक महिन्यापासून दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात सापडला आहे. मागील आठवडाभरापासून महाराष्ट्रात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकरी धास्तावले आहेत.

यावर्षी आष्टी येथील मंडळात पेरणीपासून जेमतेम प्रमाणात पडत गेलेल्या पावसावर खरिपातील पिके तग धरून उभी आहेत.वार्षीक सरासरी ६०३ असतांना आजपर्यंत १८६ मिमी पाऊस झालेला आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने कपाशी, तूर, सोयाबीन, मूग आदी पिके सुकू लागली आहे.मुगाचे पीक हातचे गेल्याने शेतकऱ्याला मोठा फटका बसला. तब्बल एक महिन्याच्या विश्रांती नंतर बुधवारी रात्री १०:३० वाजेच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. परंतू काही वेळातच पाऊस बंद झाला. दरम्यान पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात आला होता.

आठवडाभरापासून आष्टी सभोवतालच्या गावी कमी अधिक पाऊस पडला मात्र आष्टी सह आकोली, ब्राम्हणवाडी, काऱ्हाळा, हस्तूर, ढोकमाळ, लोणी, संकनपुरी, सावरगाव, परतवाडी आदी गावात पावसाने हुलकावणी दिली. पावसाअभावी कपाशी, सोयाबीन, तूर आदीसह पिके करपू लागल्याने काही शेतकरी पाणी देण्यासाठी कसरत करत आहे. परंतु या वर्षी एक ही दमदार पाऊस न पडल्याने मंडळातील लहान मोठे नदी, नाले तलाव बंधारे विहिरी ओटे कोरडेठाक पाडलेली आहे. दरम्यान जे काही गतवर्षी चे विहिरीतील उपलब्ध पाणी पिकांना देण्याचे प्रयत्न करत आहे त्यांना वारंवार होणाऱ्या खंडीत वीजपुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. दरम्यान कपाशी, सोयाबीन या पिकाला पावसाची अत्यंत गरज असल्याने शेतकरी आकाशाकडे टक लावून पहात आहे.

पंचनामे करावेत
महागाईचे बि- बियाणे, खते, किटकनाशक औषधी व मजूरी यावर मोठ्या प्रमाणात खर्च झाला. मात्र, पावसाअभावी पिके धोक्यात आली. तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. -भागवत जगदाळे, शेतकरी, आष्टी

वारंवार वीज खंडित
गतवर्षी साठवलेल्या विहिरीतील जेमतेम पाणी पिकांना देण्याचे प्रयत्न करत असताना विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. -गणेश आढे, शेतकरी, हास्तूरतांडा.

बातम्या आणखी आहेत...