आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरतूर तालुक्यातील आष्टी परिसरात सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी रात्रीही जोरदार पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला असून कपाशी लागवडीसह खरीप पेरणीची लगबग सुरू झाली आहे.
आष्टी परिसरात रविवारी सायंकाळी जवळपास एक तास पाऊस झाला होता. त्यानंतर सोमवारी दिवसभर कडक ऊन पडले होते. रात्री एक वाजेच्या सुमारास पुन्हा जवळपास तासभर जोरदार पाऊस पडल्याने शेतकरी आनंदित झाले असून मागील कटू आठवणी विसरून पुन्हा काळ्या आईची ओटी भरण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी उसाची लागवड केल्याने कपाशीचे क्षेत्र घटले होते.
मात्र कारखान्याने वेळेत न तोडल्यामुळे अनेकांना स्वखर्चाने ऊसमालक तोड करून घालावा लागला. परिणाम उत्पादनापेक्षा खर्चच अधिक झाल्याने अनेकांनी पहिल्या च वर्षात उसावर नांगर फिरवला असून आता कपाशी लागवड किंवा सोयाबीन पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यामुळे पुन्हा कपाशी, सोयाबीनचे क्षेत्र वाढणार आहे. सलग झालेल्या दोन पावसामुळे पेरणीची लगबग सुरू झाली. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. सलग दोन पाऊस पडल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.