आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणवेश वाटप़:खासगाव जि. प. प्रशालेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप़

खासगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासगाव जि. प. प्रशालेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप़खासजाफराबाद तालुक्यातील खासगाव येथे जिल्हा परिषद प्रशाला येथे पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाची वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक एस. टी. गवते व प्रमुख अतिथी म्हणून लीलाबाई लोखंडे, केंद्रप्रमुख फुलाने, नामदेव यतमाळ, मोरे उपस्थित होते.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम प्रशालेत घेण्यात आले. त्यामध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. सदरील कार्यक्रम विद्यार्थ्यांनी काढलेल्या निवडक चित्रांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यामध्ये के. के. तबडे, डी. एम. ठाकरे, सी. यू. देशमुख, व्ही. व्ही. पाटील, घुले, ढोले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाकरे यांनी केले, तर आभार तबडे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...