आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎ घोषणा:खोतकरांवर दोन लोकसभा‎ मतदारसंघांची जबाबदारी‎

जालना‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मंत्री तथा शिवसेनेचे उपनेते‎ अर्जुन खोतकर यांच्याकडे‎ परभणी आणि जालना या दोन‎ लोकसभा मतदारसंघ‎ संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी‎ देण्यात आली आहे. सोमवारी‎ शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री‎ एकनाथ शिंदे यांनी या नियुक्त्या‎ केल्यानंतर त्याची अधिकृत‎ घोषणा करण्यात आली.‎ शिवसेना उद्धव बाळासाहेब‎ ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश‎ करताच माजी मंत्री अर्जुन‎ खोतकर यांच्यावर उपनेते पदाची‎ जबाबदारी देण्यात आली होती.‎

त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ‎ शिंदे यांनी त्यांच्यावर जालना‎ आणि परभणी लोकसभा‎ मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदाची‎ जबाबदारी दिली आहे.‎ शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने‎ ज्या नियुक्त्या जाहीर केल्या‎ आहेत, त्यात १४ प्रमुख नेत्यांवर‎ २५ लोकसभा मतदारसंघाच्या‎ संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी‎ देण्यात आली आहे. माजी मंत्री‎ खोतकर शिंदे गटात गेल्यानंतर‎ शिंदे गटाची मराठवाड्यातील‎ ताकद वाढली होती. त्यातच आता‎ खोतकर यांच्यावर मोठी‎ जबाबदारी देण्यात आल्याने‎ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष‎ केला आहे. दरम्यान, खोतकर हे‎ अगोदर ठाकरे गटात कार्यरत होते.‎

बातम्या आणखी आहेत...