आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासकामांना गती:खोतकर यांचे मुख्यमंत्र्यांना जालना भेटीचे निमंत्रण

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती मिळण्यासाठी निधी मंजूर करावा, रामनगर येथील साखर कारखाना सुरू करण्यासाठी राज्य शासनाने मदत करावी, अशा विविध विषयांवर माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यात भेटीसाठी निमंत्रण दिले.

मुंबई येथे मंत्रालयात शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अर्जुन खोतकर यांनी भेट घेऊन विविध विकासकामांबाबत चर्चा केली. या वेळी माजी मंत्री अब्दुल सत्तार, सुरेश नवले, माजी मंत्री शंभूराज देसाई, भरत गोगावले आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण करण्यासाठी खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितला. पुढील आठवड्यात वेळ देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...