आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:राष्ट्रीय आदर्श माता स्पर्धेत कीर्ती अग्रवाल प्रथम स्थानी

जालना11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई येथील आयवा संस्थेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय आदर्श माता स्पर्धेत जालन्याच्या कीर्ती शिवप्रसाद अग्रवाल यांनी प्रथम येण्याच बहुमान मिळवला. जागतिक मातृदिनानिमित्त ८ मे २०२२ रोजी ऑनलाइन पद्धतीने सदर स्पर्धा घेण्यात आली.

यात माता-पित्यांचे पाल्यांसोबत असलेले वर्तन, कठीणप्रसंगी मित्र म्हणून योग्य मार्गदर्शन करणे आदी प्रश्न विचारले होते. स्पर्धेत ३१० स्पर्धकांनी सहभाग घेतला. किशोरी शहाणे, विनय जैन, दलजित कौर, हार्दिक हुंडिया, सुमन वाधवा यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

बातम्या आणखी आहेत...