आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Jalna
  • Kisan Railway Jalna | Kisan Railway Marathwada | Marathi News | Good Day To The Farmers; From Jalna, Kisan Railway Sent 350 Tons Of Onions And 15 Tons Of Sweet Oranges To Agartala

दिव्य मराठी विशेष:शेतकऱ्यांना अच्छे दिन; जालन्यातून किसान रेल्वेने 350 टन कांदा अन् 15 टन मोसंबी आगरतळाला रवाना

बाबासाहेब डोंगरे | जालना6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना येथील रेल्वेस्थानकावर किसान रेल्वेमध्ये मोसंबी भरताना शेतकरी. - Divya Marathi
जालना येथील रेल्वेस्थानकावर किसान रेल्वेमध्ये मोसंबी भरताना शेतकरी.
  • महाराष्ट्रासह परराज्यातून मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना मिळतेय उत्पन्नाची नवी संधी, केंद्र सरकारतर्फे भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे लागवडही वाढली
  • सध्या जिल्ह्यात २० हजार १५५ हेक्टरवर मोसंबीच्या बागा

जालन्यातून सोमवारी तिसरी किसान रेल्वे रवाना झाली असून याद्वारे ३५० टन कांद्यासह १० टन मोसंबी आगरतळाला (त्रिपुरा) पाठवण्यात आली. या सुविधेमुळे अधिकचा बाजारभाव ज्या मार्केटमध्ये असेल तेथे कमी खर्चात व कमी वेळेत शेतमाल पोहोचवून अधिकचे पैसे मिळवणे शक्य झाले आहे. रेल्वेद्वारे देशातील नामांकित बाजारपेठेत मोसंबी पाेहोचल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मोसंबीचा जिल्हा म्हणून जालना ओळखला जातो. मोसंबीचे विस्तारित क्षेत्र लक्षात घेत केंद्र शासनाने भौगोलिक मानांकन दिले आहे. सध्या जिल्ह्यात २० हजार १५५ हेक्टरवर मोसंबीच्या बागा असून वर्ष २०२१-२२ मध्ये यातून १ लाख ३४ हजार २५० मेट्रिक टन उत्पादन निघाले होते.

भौगोलिक परिस्थिती अनुकूल असल्यामुळे महाराष्ट्रासह परराज्यांतून मोसंबीला मागणी वाढल्यामुळे लागवडही उत्तरोत्तर वाढत आहे. आता यात भर पडली आहे ती किसान रेल्वेची. या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात सहजरीत्या मोसंबीसह इतर शेतमाल पाठवणे शक्य झाले आहे.

अवघ्या दीड महिन्यात तीन किसान रेल्वे धावल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला हातभार लागणार आहे. कृषी मालाची जलद, निर्धोक, सुरक्षित व किफायतशीर रीतीने कमीत कमी खर्चात दूरपर्यंत पोहाेच याद्वारे शक्य होणार आहे.

अशा धावल्या तिन्ही किसान रेल्वे : जालना तालुक्यातील आंतरवाला येथील बीपीजी फार्मर्स प्रोड्युसर ग्रुपच्या माध्यमातून २ जानेवारी २०२२ रोजी जालन्यातून पहिली किसान रेल्वे जोरहाट (आसाम) पर्यंत धावली. यातून ३४८ टन कांदा पाठवण्यात आला होता. ८ फेब्रुवारी रोजी ३४८ टन कांदा, तर १४ फेब्रुवारी रोजी पुन्हा ३३५ टन कांदा आणि १५ टन मोसंबी घेऊन किसान रेल्वे आगरतळाला (त्रिपुरा) पाठवण्यात आली आहे. जालना तालुक्यातील सामनगाव, आंतरवाला, बठाण व पैठण तालुक्यातील खादगाव येथील शेतकऱ्यांनी प्रथमच रेल्वेने मोसंबी परराज्यात पाठवली. यामुळे त्यांच्या चेहऱ्यांवरही आनंद होता.

भौगोलिक मानांकनासाठी नोंदणी करण्याचे आत्माचे आवाहन : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत भौगोलिक मानांकनाच्या अनुषंगाने मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी केली जात आहे. या आधारे संबंधित शेतकऱ्याला भौगोलिक मानांकनानुसार आपला शेतमाल विक्री करता येईल व त्यातून पैसेही अधिकचे मिळतील, असे आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक दत्तात्रय सूर्यवंशी यांनी सांगितले.

जालन्याच्या मोसंबीला परराज्यात दीडपटीहून अधिक भाव
जालना मार्केटमध्ये मोसंबीला सध्या २० ते २७ हजार प्रतिटन भाव मिळत आहे, तर आगरतळामध्ये प्रतिटन ४ हजारांहून अधिक दर आहे. ही तफावत लक्षात घेता स्थानिक बाजारपेठेपेक्षा दीडपट भाव शेतकऱ्यांना मिळू शकतो. किसान रेल्वेच्या माध्यमातून जालनाच नव्हे, तर मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांनासुद्धा आपला शेतमाल अधिक भाव मिळणाऱ्या मार्केटमध्ये पाठवणे शक्य आहे. गटशेतीच्या माध्यमातून हे शक्य आहे. -भास्कर पडूळ, संचाजक, बीपीजी फार्मर्स प्रोड्युसर ग्रुप आंतरवाला, ता. जालना

बातम्या आणखी आहेत...