आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी घटना:विजेचा शॉक लागून कोपर्डा येथील शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; बुधवारी सकाळी घडली घटना

फत्तेपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विहिरीवरील विद्युत मोटार चालू करीत असतांना अचानक स्विच बोर्डात करंट उतरल्याने विजेचा शॉक लागून भोकरदन तालुक्यातील कोपर्डा येथील ज्ञानेश्वर सुखदेव पाबळे (४६) या शेतकऱ्याचा बुधवारी सकाळी मृत्यु झाला.

पाबळे सकाळी ते जनावरांना पाणी पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या हौदात पाणी भरण्यासाठी विहीरीवरील विद्यूत मोटार चालू करण्यासाठी गेले होते. स्विच बोर्डात करंट उतरल्याने ज्ञानेश्वर पाबळे यांना विजेचा जोरदार शॉक लागला असता त्यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत्यू घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...