आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरेकृष्णा सत्संग समिती:कृष्णाने सामाजिक ऐक्याचा काला केला : तिवारी

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीकृष्णाने अधर्माचे वाढते प्रस्त, दुष्ट शक्तीचा विनाश करण्यासाठी गोकुळा बाहेर जाणारे दही बाल - गोपालांना वाटून धष्टपुष्ट केले.तर दहीहंडीतून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला, असे प्रतिपादन निरूपणकार किशोरजी तिवारी यांनी केले. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त हरेकृष्णा सत्संग समिती व जन्माष्टमी महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील रूपम हॉल येथे सुरू असलेल्या श्रीकृष्ण बाललीलामृत कथेचा शनिवारी धुमधडाक्यात समारोप झाला. पेंद्या, वाकुल्या, गोपाळां सह आलेल्या बालकृष्णाने फोडलेली दहीहंडी, संगीत मय भक्ती गीतांवर तल्लीन झालेल्या भाविकांनी देहभान विसरून नृत्याचा ठेका धरला पुष्पवृष्टी , फुलांची उधळण ही केली. प्रारंभी समितीचे अध्यक्ष विजय राठी, अंकुशराव राऊत,विष्णू पाचफुले, मेघराज चौधरी,योगेश ठक्कर, कैलास चंदभणानी, महामंञी मनीष तवरावाला, अनिल सोनी, यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, पंडितराव भुतेकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. श्रीकृष्णांच्या बाललीलांचे निरूपण करताना किशोरजी तिवारी यांनी कृष्ण नावाचे बीज मनात पेरावे, संतांची संगत, सत्संगाने मनाची मशागत करावी आणि त्या बीजाचे संगोपन केल्यास कधी ना कधी ईश्वराची साक्षात प्राप्ती होतेच. असे नमूद केले. यावेळी नारायण चाळगे, जगदीश प्रिथ्यानी, गेंदालाल झुंगे, दिलीप शाह, डोंगरसिंह राजपुरोहित, मुन्ना गजबी, पवन जोशी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...