आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहानेंचा गौरव:सेवापूर्तीबद्दल मुख्याध्यापक लहानेंचा गौरव

टेंभुर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आर. डी. लहाने हे बुधवारी सेवानिवृत्त झाले. केंद्रातील शिक्षकांतर्फे निरोप देवून त्यांचा आईसह सपत्नीक गौरव करण्यात आला.

या वेळी शिक्षणविस्तार अधिकारी राम खराडे, सेवानिवृत्त मुख्या\ध्यापक शंकरराव देशमुख, दगडुबा देठे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्रीधर तिडके, पतसंस्थेचे संचालक गणेश पवार, माजी उपसरपंच कौतीकराव लहाने, आई साखराबाई लहाने, पत्नी सुनिता लहाने, मुख्याध्यापक मुरलीधर वायाळ, आदर्श शिक्षक शेख जमीर, मधुकर मुंढे आदींची उपस्थिती होती. लहाने म्हणाले की, सेवाकाळात सर्वांच्या मिळालेल्या सहकार्यामुळेच आपण सेवेची ३६ वर्षे यशस्वीरित्या पुर्ण करू शकलो.

यावेळी लहाने यांची कन्या ज्योती लहाने हिने आपल्या वडिलांप्रती काढलेल्या भावनिक उद्गाराने उपस्थितांची डोळे पाणावली होती. सूत्रसंचालन गणेश उगलमुगले यांनी केले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक मुरलीधर वायाळ, शिक्षक अनंता माने, दीपक इंगळे, एकनाथ पंडित, रमेश शेळके, शिक्षिका छाया पुंगळे, मंगल साने, मीरा पायघन आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमासाठी पालघर येथील शिक्षक सुनील डोमरे, गणेश लहाने, विजय लहाने, राजू कोरडे, पंडित फलके यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...