आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिबंधात्मक उपाय:कुंबेफळ, जामखेडमध्ये ‘लम्पी’चा शिरकाव; बाधित क्षेत्र केले घोषित

जालना22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात लम्पी आजाराने शिरकाव केला असून जालना तालुक्यातील कुंबेफळ, अंबड तालुक्यातील जामखेड व भोकरदन तालुक्यातील वरुड येथील नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जनावरांच्या संसर्ग केंद्रापासून ५ किमी बाधित तर १० किमीपर्यंत निगराणी क्षेत्र घोषित केले आहे. सदरील गावापासून बाधित व निगराणी क्षेत्रामधील मोठ्या जनावरांची खरेदी-विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा, प्रदर्शन, बैलाच्या शर्यती आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

पुणे येथील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (रोग अन्वेषण विभाग, औंध) कडून लम्पीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनासह संबंधित यंत्रणा सतर्क झाली असून संसर्ग नियंत्रणासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. यात प्राण्यांमधील संक्रमण व संसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये जिल्ह्यातील बाधित व अबाधित पशुधनास आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक लसीकरण करणे बंधनकारक केले आहे.

वरुडमधील पथकाकडून उपचार
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी. एस. कांबळे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, पशुधन विकास अधिकारी डॉ. उत्कर्ष वानखेडे, डॉ. रोहीनी साळवे, डॉ. राजरत्न वाघमारे, पशुधन पर्यवेक्षक संजय जोशी, अमरदीप जोगदंडे यांच्या पथकाने गावातील बाधित जनावरांची पाहणी उपचार केले. तसेच या गावापासून ५ किमी परिसरातील जनावरांचे लसीकरण करणार असल्याची माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...