आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास:स्वखर्चातून कुमकर वस्ती पाणंद रस्त्याचे काम सुरू; जि.प. सदस्य शालीकराम म्हस्के यांचा पुढाकार

टेंभुर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील कुमकर वस्ती वर जाणाऱ्या तीन किलोमीटर पांदन रस्त्याचे रखडलेले काम अखेर शनिवारी जिल्हा परिषद सदस्य शालिकराम म्हस्के यांनी स्वखर्चातून सुरू केले

टेंभुर्णी करांचा आराध्य दैवत असलेल्या कुमकर वस्ती वरील गणपती मंदिराकडे जाण्यासाठी भाविकांना अडचण होत असेल तर दूरच या भागात असलेल्या शेतकऱ्यांनाही शेतीचे साहित्य व इतर कामे करताना रस्त्यावर अडचणी येत होत्या यामुळे शेतकऱ्यांकडून वारंवार रस्ता करण्यासंदर्भात विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली होती परंतु राजकीय हेवेदावे यातून या रस्त्याचे काम रखडले होते येथील ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव कुमकर मुरलीधर कुमकर व इतरांनी शेतकऱ्यांसाठी पावसाळ्यात हा रस्ता अडचणीचा असल्याने या रस्त्याचे काम करावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य शालीकराम मस्के यांच्याकडे केली यामुळे सामाजिक भान ठेवत श्री मस्के यांनी स्वखर्चातून या पाणंद रस्त्याचे माती काम करण्यासाठी जेसीपी उपलब्ध करून दिले या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव कुमकर, माजी उपसरपंच फैसल चाऊस, बाबुराव जाधव शरद गायमुखे, रामराव जमधडे अर्जुन जमधडे राम गुरव विलास कुमकर काशिनाथ जमदाडे शिवाजी मुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरलीधर कुमकर यांनी केले कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेती साहित्याची वाहतूक करणे होईल सोपे
जिल्हा परिषद सदस्य शालीकराम म्हस्के यांनी स्वखर्चातून आमच्या पाणंद रस्त्याचे काम सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे दरम्यान येत्या पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी रस्ता सोयीचा होणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे स्वखर्चातून रस्ता उपलब्ध करून दिल्याने म्हस्के यांचे मानावे तेवढे आभार कमी आहे.

बातम्या आणखी आहेत...