आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:कुंडलिका नदीकाठी गार्डन करणार; जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी तत्वतः मंजुरी

जालना23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समस्त महाजन ट्रस्ट आणि कुंडलिका - सीना नदी पुनरुज्जीवन फाउंडेशनच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या कुंडलिका-सीना नदी येथील वृक्षारोपण उपक्रमात जालना रोटरी क्लबने सक्रिय सहभाग नोंदवत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नदीकाठी ५० वटवृक्षाची लागवड केली. दरम्यान, रोटरी क्लबच्यावतीने कुंडलिका नदीकाठी गार्डन विकसित करण्याचा निर्णय घेतला असून, त्यास जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे.

जालना रोटरी क्लबने पर्यावरण संरक्षणासाठीही पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कुंडलिका नदीकाठी उद्योजक तथा कुंडलिका - सीना नदी पुनरुज्जीवन फाउंडेशनचे सुनील रायठठ्ठा यांच्या प्रमुख उपस्थितीत ५० वटवृक्षांची लागवड केली. यावेळी रोटरीच्या उपप्रांतपाल डॉ. सुमित्रा गादिया, महेंद्र बागडी, अरुण अग्रवाल, शरद लाहोटी, रमेश अग्रवाल, रामनिवास मानधनी, सुरेश मगरे, डॉ. विजय जेथलिया, किशोर देशपांडे, शिवरतन मुंदडा, राजेश बजाज, जगदीश राठी, दीपक पंच, प्रवीणभाई भानुशाली, किरण हंसोरा, मोहित भक्कड, श्रुती छाबडा, रवी भक्कड, प्रणय राठी, यश बगडिया, श्रवण मुंदडा, राहुल बोरा, आदित्य पाटणी आदी उपस्थित होते. वृक्षारोपणासाठी उदय शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले. दरम्यान, जालना रोटरी क्लबच्यावतीने साकारण्यात येणाऱ्या गार्डनमुळे नदीकाठाच्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल. हे गार्डन अधिकाधिक कसे फुलविता येईल, यावर आमचा भर राहणार आहे. हे ठिकाण जालनेकरांसाठी विरंगुळ्याचे ठरेल असा विश्वास महेंद्र बागडी यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...