आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसंधारण:कुंडलिका, सीना पाणलोटातील 75 हजार एकरांवर हाेणार जलसंधारण

जालना7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घानेवाडी तलाव, मोतीबाग, जामवाडी या लघु प्रकल्पातील पाण्याचा परिसरातील २५ गावांबरोबर, शेतीबरोबर संबध येतो. या प्रकल्पावरून कुंडलिका तसेच सीना नदीतील पाणी उपलब्धता ठरते. यामुळे दोन्ही नद्या चिरकाल जिवंत ठेवण्यासाठी परिसरातील २५ गावांतील ७५ हजार एकर क्षेत्रावर जलसंधारणाचे काम करावे लागणार असल्याचा आराखडा सेंटर फॉर इन्व्हारमेंटल रिसर्च अॅन्ड एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून नदी पुनरूज्जीवन संस्थेतील तज्ज्ञांनी तयार करून दिला. फेब्रुवारी ते नोव्हेंबर दरम्यान हे काम केले आहे.

कुंडलिका, सीना रिज्यूवनेशन ॲन्ड डेव्हलपमेंट फाउंडेशन, समस्त महाजन मुंबई विविध सामाजिक संस्था, उद्योजक, शहरी, ग्रामीण भागातील नागरिक काम करणार आहेत. शहराला कुंडलिका, सीना या दोन नद्यांचे पात्र लाभलेले आहे. या नद्यांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी कुंडलिका सीना नदी रिन्युवेशन अॅन्ड डेव्हलपमेंट फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून २०१९ पासुन घाणेवाडी तलाव ते कुंडलिका, सीना नदी परिसर आदी ठिकाणी कामे केली जात आहे.

यासाठी २०२२ मध्ये सेंटर फॉर इन्व्हारमेंटल रिसर्च अॅन्ड एज्युकेशन संस्थेकडून महिको फाउंडेशनच्या माध्यमातून संस्थेने नदी पुनरूज्जीवन संस्थेतील तज्ञांचे काम करणाऱ्यांना नदी पात्राचे उगमस्थान ते शेवट याचा प्रारूप आराखडा तयार करून घेतला आहे. यात परिसरातील २५ गावांत जलसंधारणाचे काम करण्याबाबत सुचवले आहे. दरम्यान गावांतील आर्थिक स्तरही उंचावणार आहे. ज्यात पिक पद्धतीची निवड करण्याबरोबरच खतांचा वापर आदी बाबीवरही काम होणार आहे. परिसरातील ७५ हजार एकर क्षेत्रावर ही काम करण्याचा आराखड्यात समावेश आहे.

या सर्व प्रक्रियेसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विशेष पुढाकार घेण्यात आला. ज्यात महसुल विभागाकडून मोठ्या कामाचा वाटाही उचलल्या जाणार आहे. या शिवाय पालिका, प्रशासन, उद्योजक, लोकप्रतिनिधी, सामान्य नागरिक, कृषी विज्ञान केंद्र असा सर्वांचा यात सहभाग असेल. या आराखड्याला जोडून असलेले काम सध्या कुंडलिका पात्रात सुरू असून हे काम पुर्ण हाेताच इतर कामांना सुरूवात होणार आहे.

मातीवर पडलेले पाणी जिरवायचे
रासायनीक खतांचा वापर, शहरात होणारे प्रदुषण गटारातून नदीत येणारे घटक, माती वाहुन जाण्याचे प्रमाण थांबवणे हे कायमस्वरूपी थांबवुन शेतातील मातीवरही काम करण्यात येणार आहे. नदी बारमाही खळखळा वी हा उद्देश यातून ठेवण्यात आला आहे.

प्रत्येक माध्यम महत्त्वाचे
नदी जिवंत ठेवण्यासाठी त्यामध्ये येणाऱ्या परिसरातही काम करणे गरजेचे आहे. ज्या भागातून पाणी प्रकल्पात दाखल होते. या बरोबरच नदी पात्रात दाखल हाेते. या ठिकाणी बंधारे उभारणी महत्वाची आहे. ज्यामुळे पाणी जमिनीतून दाखल होते. शिवाय वाहुन येणाऱ्या पाण्याचीही गुणवत्ता राहते. जल प्रवाहाच्या मार्गातील प्रत्येक माध्यम महत्त्वाचा आहे.-डॉ. अजित गोखले, भूजलतज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...