आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकदिवसीय प्रशिक्षण:केव्हीके कडून महिलांना देण्यात आले आिळंबीचे धडे

जालना14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना अंतर्गत, दैठणा, ता. घनसावंगी येथे १९ नोव्हेंबर रोजी अळिंबी उत्पादन व विविध पदार्थ या विषयावर शेतकरी महिलांकरिता एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.

सध्याची शेती ही हवामानवर अवलंबून आहे, शेतीतील पी कवलेल्या मालचि किंमत शेतकरी ठरवू शकत नाही तर व्यापारी ठरवतात. वर्षभर मेहनत करून देखील शेतकऱ्यांचा हातात काहीच उरत नाही त्यामुळे शेतीला पूरक व्यवसायाची सांगड दिली तर निश्चितच फायदा होऊ शकतो. त्यामुळेचा मौजे दैठना येथे प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.

यामध्ये खरपूडी कृषि विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान तज्ञ प्रा.एस. एन. कऱ्हाळे यांनी महिलांना अळिंबी (मुशरूम) उत्पादन विषयी माहिती सांगितली व त्यासाठी लागणारे वातावरण, साहित्य, खर्च व उत्पादन विषयी सविस्तर प्रत्यक्षिकाद्वारे सांगितले, तसेच अळिंबीचे आहारातील महत्व सांगून विविध पदार्थ प्रत्यक्षिकाद्वारे करून दाखवले. हा प्रशिक्षण कार्यक्रम कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.एस. व्ही सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमात मौजे दैठना व मानेपुरी येथील महिला व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...