आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चासत्र:केव्हीके शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्याचे प्रभावी व्यासपीठ ; डॉ. लाखन सिंग यांचे प्रतिपादन

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहविण्यासाठी कृषी विज्ञान मंडळ हे प्रभावी व्यासपीठ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन शेतीत सुधारणा करून आर्थिक उन्नती घडवून आणली पाहिजे. कृषी विज्ञान केंद्र, जालना-१ हे देशात एकमेव केंद्र आहे जे दर महिन्याला शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तांत्रिक सत्राचे आयोजन सातत्याने करत असते. असे प्रतिपादन आयसीएआर-अटारी, पुणेचे संचालक डॉ.लाखन सिंग यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी जालना आयोजित कृषी विज्ञान मंडळाच्या ३०३ व्या मासिक चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून सुदामअप्पा साळुंके, विश्वस्त, मराठवाडा शेती सहाय्य मंडळ, जालना; प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.हरिहर कौसडिकर, संचालक संशोधन, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे; बांबू सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्रचे संचालक, अरुण वांद्रे, कृषी विज्ञान केंद्र बदनापूरचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सोमवंशी, एमजीएम, गांधेली कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.सुकासे तसेच कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी जालनाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. व्ही. सोनुने यांची उपस्थिती होती.

प्रास्ताविक करताना डॉ.सोनुने म्हणाले की, बांबू लागवड ही काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. परंतु अजूनही शेतकरी लागवडीकडे वळत आहेत. तसेच कार्बन क्रेडिटमधे शेतकऱ्यांना नवीन संधी काय आहे, मोठ्या प्रमाणात लागवड करत आहेत परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर हा विचार करून त्यापोटी पैसे देत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यात सहभागी होता येईल का अश्या परिस्थितीत काय करता येईल. जालना जिल्हामधील शेतकरी याचा अभ्यास करून फायदा घेतील असे मत त्यांनी मांडले. यावेळी परिसरातील शेतकरी, कृषी विज्ञान केंद्रातील विविध विषयतज्ञ, पदाधिकारी, अधिकारी मोठया संख्येेने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...