आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:दाभाडी येथे एटीएम कार्ड नसल्याने ग्राहकांची गैरसोय, बँकेत वारंवार जाऊन नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे

चिखली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गेल्या दोन महिन्यांपासून एटीएम कार्ड नसल्याने शेतकरी व महिलांची गैरसोय होत आहे. बँकेत वारंवार जाऊन नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

दोन महिन्यांपासून किमान एक ग्राहक कमीत कमी पाच ते दहा चकरा एटीएम कार्डसाठी मारत आहे. बदनापूर तालुक्यातील दाभाडी हे सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव असून येथे जवळपास ३५ ते ४० गावांच्या नागरिकांचा व्यवहार या बँकेशी आहे. परंतु महाराष्ट्र बँकेचे एटीएम कार्ड नसल्याने सर्वात मोठा त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे. बँकेकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला जात नाही. बँकेत गेल्यानंतर म्हणतात, वरिष्ठांना जाऊन भेटा.

ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी मिनी ग्राहक, महाराष्ट्र ग्रामीण बँक ग्राहक सेवा केंद्रे सुरू आहेत. परंतु, काही शेतकऱ्यांचे व महिलांचे मशीनवर थंबच येत नाहीत. परिणामी ग्राहक सेवा केंद्रातून पैसे निघत नाहीत. काही महिलांना व शेतकऱ्यांना दाभाडी बँकेत जाऊन पैसे काढण्याची वेळ येत आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जवळपास दोन महिन्यांपासून दहा वेळेस जाऊनही नवीन एटीएम कार्ड मिळत नाही. याची तत्काळ वरिष्ठांनी दखल घेऊन एटीएम कार्ड शेतकऱ्यांना व महिलांना देण्यात यावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, अशी प्रतिक्रिया चिखलीचे शेतकरी अतुल देशमुख यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...