आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मजूर मिळेना:कापूस वेचणीसाठी मजूर मिळेना; शेतकऱ्यांचे अख्खे कुटुंब शेतात

टेंभुर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यांमध्ये पावसाने उघडीप दिल्याने कापूस वेचणीच्या कामाला वेग आला आहे. दरम्यान, मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या कुटुंबालाच कापूस वेचणीसाठी शेतात जावे लागत आहे. दिवाळीच्या सुट्ट्यातही शालेय विद्यार्थी शेतात कापूस वेचणीस आपल्या पालकांना मदत करीत आहेत.

कापूस वेचणीचा दर सद्यस्थितीत प्रति किलो दहा रुपये प्रमाणे मजुरी द्यावी लागत आहे. काही भागात तर १२ रुपये प्रति किलो कापूस वेचणीचा दर देऊनही मजूर मिळेनासे झाले. परंतु मागील महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीची कामे ठप्प झाली होती. परिणामी एकाच वेळी सर्वच भागात कापूस वेचणी झाल्याने मजुरा अभावी शेतकरी परेशान झाले आहेत.

अगोदरच पावसाच्या व कृपेने कपाशीची खालची दहा ते पंधरा बोंडे सडून पिकाचे नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत पाच पाच कापसाचे बोंडे फुटली असून ही वेचून घरात आणण्याची लगबग शेतकऱ्याची दिसून येत आहे. मागील महिन्यात झालेल्या पावसाने शेतीची कामे एकाच वेळी आल्याने मजुराचा तुटवडा निर्माण झाला आहे. कापूस वेचणीसाठी दररोज सकाळी गावातील विविध भागात फिरून मजूर पाहत आहे. पन्नास रुपये धडा वेचणीचा दर करूनही मजूर मिळत नसल्याचे कापूस उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर उखर्डे यांनी सांगितले. तर सततच्या पावसामुळे कपाशीच्या बोंड्या खराब झाल्याने उत्पादन घटले आहे.

बातम्या आणखी आहेत...