आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालपरी:जालना विभागामधील लालपरी कोकणातील प्रवाशांवर मेहेरबान

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गौरी-गणपतीच्या सणासाठी एसटी महामंडळाच्या जालना विभागातील २५० पैकी ९० बसगाड्या ३१ आॅगस्टपासून काेकण विभागातील प्रवाशांच्या साेयीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे विभागातील प्रवाशांची ऐन सणासुदीत परवड सुरू आहे. गाड्याच नसल्याने गौरी सणासाठी गावी निघालेल्या प्रवाशांना बसस्थानकावर तासन््तास ताटकळावे लागले. अनेक प्रवाशांनी खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घेत गाव गाठणे पसंत केले.

आधी कोरोनाकाळ आणि नंतर कर्मचाऱ्यांचे लांबलेले आंदोलन यामुळे मोठ्या प्रमाणात तोटा सहन करणारी लालपरी सध्या पूर्वपदावर आली आहे. कर्मचाऱ्यांनाही वेतनवाढ, इतर सुविधा दिल्याने कर्मचारी आनंदी आहेत. सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांचाही कलही एसटीकडेच आहे. मागील आठ दिवसांपासून बससेवा पूर्णपणे कोलमडली असून प्रवाशंाना तासंन‌॰्तास बसस्थानकावर गाड्यांची वाट पाहत थंाबावे लागत आहे. गौरी-गणपतीसाठी जालना विभागातून मुंबईसह कोकण विभागात ९० गाड्या पाठवण्यात आल्या आहेत.

यामुळे जिल्ह्यात इतर मार्गांच्या फेऱ्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. परिणामी प्रवाशांना गाड्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. जालना येथून सिल्लोड, औरंगाबाद, बीड, परभणी, मेहकर, चिखली, बुलडाणा या मार्गावरील प्रवासी संख्या अधिक आहे.

अंबड आगारातून धुळे, पुणे, नागपूर, अकोला, औरंगाबाद, सिल्लोड या मार्गावर जास्तीच्या गाड्या आहेत. परंतु गाड्यांची संख्या कमी झाल्याने अनेक मार्गावर प्रवाशांना नाइलाजाने खासगी वाहनांतून जादा पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून प्रवाशांचे हाल होत आहेत. आैरंगाबादेतून जालन्याकडे येणाऱ्या प्रवाशांना सिडको बसस्थानकावर तब्बल तासभर प्रतीक्षा करावी लागत आहे. बीड, मेहकर, चिखली या मार्गावरील गाड्याही फुल्ल भरून येत असल्याने जालनेकर प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळत नसल्याचा प्रकार शनिवारी बघायला मिळाला.

जालना, भोकरदन, सिल्लोड मार्गावर हाल
कोरोनाकाळात बसेस बंद करण्यात आल्याने जालना ते सिल्लोड मार्गावरील गाड्यांचे नियोजन पूर्णत: कोलमडले होते. सध्या या मार्गावर तुरळक गाड्या असून सायंकाळी ५ वाजता बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांना सात किंवा आठ वाजेपर्यंत ताटकळावे लागत आहे. जालना-सिल्लोड मार्गावर सायंकाळी ७ आणि ८ या वेळेत पूर्वीप्रमाणे दोन गाड्या सोडाव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. मागील महिनाभरापासून पाच वाजेपासून थांबवलेल्या प्रवाशांना ८ किंवा ८:३० वाजेनंतर बस उपलब्ध होते. याकडे लक्ष द्यावे. -योगेश ठोंबरे, प्रवासी, जालना

जालन्यातूनही पाठवल्या मुंबईसाठी गाड्या ^जालन्यातूनही कोकणात पाठवण्यासाठी बसेस देण्यात आल्या आहेत. या बस सोडण्याचा निर्णय मुंबई कार्यालयाकडून झाल्यामुळे वरिष्ठांच्या मागणीनुसार गाड्या दिल्या जातात. मुंबईला दिलेल्या गाड्या लवकरच उपलब्ध होणार आहेत. त्यामुळेे वाहतुक सुविधा लवकरच सुरळीत होईल. -प्रमोद नेहुल, विभाग नियंत्रक, जालना

बातम्या आणखी आहेत...