आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा:येत्या साेमवारपासून भूमी अभिलेख विभागाची परीक्षा

जालना6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूमी अभिलेख विभागाची सरळ सेवा भरतीची ऑनलाइन परीक्षा २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेश पत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mahabhumi.gov.in) लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे पात्र उमेदवाराने संबंधित संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सूचनांनुसार प्रवेशपत्रे डाऊनलोड करुन घ्यावे व प्रवेश पत्रावर नमुद परिक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डी. एल. घोडके यांनी केले आहे.

गत ९ डिसेंबर २०२१ रोजी भूमी अभिलेख विभागातील गट-क पदसमूह-४ भूकरमापक तथा लिपिक संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भारण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार ९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर केले होते. त्यानंतर सदर अर्जदारांना विभागाकडून २८ फेब्रुवारी ते १३ मार्च २०२२ या कालावधीत छाननी अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करुन दिली होती.

यानुसार अर्जाबाबतची सर्व पूर्तता करणाऱ्या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा येत्या २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत विविध केंद्रावर घेण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...