आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:आव्हाना परिसरात सोयाबीन पिकाची मोठे नुकसान, जिल्हाभरात जवळपास दोन हजार हेक्टपेक्षा अधिक लागवड

आव्हाना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील आव्हाना परिसरातील या वर्षी आव्हाना परिसरात मोठ्या प्रमाणावर उन्हाळी सोयाबीन लागवड झाली होती. परंतु, या सोयाबीन पिकाला कुठल्या प्रकारचे फुले व शेंगा लागताना दिसत नाही. याबाबत कृषि विभागाकडून कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले नसल्याने हा प्रकार घडला आहे.

दरवर्षी रब्बी हंगामातील सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे उन्हाळ्यात बियाणे निर्माण करण्याचा प्रयोग मागील दोन वर्षापासून केला जात आहे. पहिल्या वर्षी हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. याच्या अनुभवावर दुसऱ्या वर्षीही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. दरम्यान, यावर्षी सोयाबीन पिकाला चांगल्या प्रकारचा बाजारात भाव असल्याने यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने आपल्या शेतात उन्हाळी सोयाबीन पीकाची लागवड केली. कमी खर्चिक व कमी पाण्याचे पीक असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या पिकाला पसंती दिली. परंतु, या पिकाला कुठल्या प्रकारचे फुले लागताना दिसत नाही. यामुळे शेतकरी शेतकरी पुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणावर पाणी भरून देखील या पिकाला फुले लागत नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. यावर्षी उष्णता जास्त असल्यामुळे या पिकाला पाणी देखील अधिक लागत आहे. मात्र, परिसरात काही ठिकाणी पाणी कमी असल्याने हे पीक सुकले आहे. हे पीक येईल याची कुठल्याच प्रकारची खात्री नाही. ऐन फुले तसेच शेंगा लागण्याची स्थिती असताना पिकाला काहीच येत नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनमध्ये गुरे चरण्यासाठी सोडली आहे. दरम्यान, हे पिक लागवड करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या सोयाबीनचा पंचनामा करून मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

सोयाबीनला आजपर्यंत शेंगा अन फुलेही लागलेले नाही
रब्बी हंगामात निर्माण होणाऱ्या सोयाबीन बियाण्याच्या तुटवडा भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची लागवड करावी असे आवाहन कृषि विभागाकडून केले जाते. या आवाहनाला मुबलक पाण्याची जोड लागल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. मोठा खर्चही केला. मात्र, ऐन फुले, शेंगा लागण्याच्या वेळेत पिकाला काहीच नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनमध्ये गुरे चारण्यासाठी सोडली असल्याचे ज्ञानेश्वर श्रीरंग गावडे या शेतकऱ्याने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...