आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबड तालुक्यातील झिरपी फाटयाजवळ महादेव मंदीरासमोरील सरकारी गायरान जमीनीवर मोठया प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार असून यासाठी जमीनीची स्वच्छता, सपाटीकरण करण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी उप विभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, तहसिलदार विद्याचरण कडवकर, पोलिस निरीक्षक शिरीष हुंबे, गोपनीय शाखेचे रामेश्वर मुळक, दिगंबर कुरेवाड, ग्रामविकास अधिकारी सतिष भापकर, मुख्याध्यापक आश्रुबा गवई, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदिप भवर, सतिष फोके, भगवान रेगुडे, विकास भवर, गणेश फोके, दत्ता भवर, मोहन भागवत, भगवान भवर, सर्जेराव भवर, गोपाल भवर, श्याम भवर, कृष्णा भवर, परमेश्वर पालेकर, दिनेश फोके, उज्वला फोके, अनिता भवर, पद्माबाई भवर आदी वृक्षमित्र उपस्थित होते. सरकारी गायरान जमीनीवर समस्त महाजन ट्रस्ट कडुन मोफत मिळालेल्या जेसीबीमध्ये डॉ. लक्ष्मण सावंत यांनी डिझेल टाकून सहकार्य केले आहे. रस्त्याचे सरळीकरण झाल्यानंतर लोकवर्गणी करुन सिमेंट पाईप टाकणे, शेततळे करणे, खड्डे, तारकंपाऊंड, बोर, मोटर, पाण्याची टाकी, ठिबक अशी तयारी पूर्ण झाल्यावर वृक्षारोपणाची तारीख निश्चित करण्यात येईल, असे देवा चित्राल यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.