आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाधान:जलतारा प्रकल्पाची माहिती जाणून घेतली; जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांच्याकडून कौतुक

वाटूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मंठा तालुक्यातील ५०गावांमध्ये आर्ट ऑफ लिविंग अमेरिकास्थित ओ. व्ही. बी.आय. आणि आय.ए. एच. व्ही. यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या जलतारा प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी माहिती जाणून घेत कौतुक केले.

मंठा तालुक्यातील ५० गावांमध्ये आर्ट ऑफ लिविंग अमेरिकास्थित ओ. व्ही. बी.आय. आणि आय.ए. एच. व्ही. यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी ते जून असा सहा महिन्यांपासून हा प्रकल्प सध्या ५० गावात सुरू आहे. प्रा. डॉ. पुरुषोत्तम वायाळ या प्रकल्पाचे काम पाहत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात काम चालू आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात चार बाय चार आणि सहा फूट खोल, या पद्धतीने पन्नास गावातील एक लाख हेक्टर वर जवळपास लाखो शेत पुनर्भरणाच्या खड्ड्याची निर्मिती चे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. याबाबत सर्व प्रकल्प बाबत माहिती डॉ. वायाळ यांनी जिल्हाधिकारी राठोड यांना दिली. एकूण कामाची पाहणी करून त्यांनी कौतुक केले.

दरम्यान प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून या प्रकल्पा नंतर वृक्षारोपणाचे मोहीम देखील पावसाळ्यात हाती घेण्यात येणार आहे. एक पीट एक वृक्ष ही मोहीम जून च्या पावसानंतर वृक्ष लागवडीसाठी आणि संवर्धनासाठी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी वृक्ष दान करू इच्छिणाऱ्या संस्था तसेच ग्रामस्थ प्रशासन यांना आवाहन संस्थेच्या वतीने डॉ पुरुषोत्तम वायाळ यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...