आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सापळा:बिबट्या अखेर जेरबंद; ड्रोनच्या आधाराने पाहणी; कटरने गवत कापून घेतला शोध

वडीगोद्रीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी परिसरात दोन दिवसांपासून नदीत असलेल्या‌ बिबट्याला वन विभागाला पकडण्यात यश आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. ड्रोनच्या आधाराने व कटरने गवत कापून त्याचा शोध घेतला आहे. शिकाऱ्याने रानडुक्कर पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात बिबट्याचा पंजा कटल्यामुळे तो जखमी झाला होता. अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील शेतकरी शरद बाळासाहेब घाडगे यांच्या मोसंबीच्या शेतात शिकाऱ्याने रानडुक्कर पकडण्यासाठी सापळा लावला होता. परंतु या सापळयात रानडुकराऐवजी बिबट्या अडकून बसला. बिबट्याने त्या सापळ्यासह पलायन करण्याचा प्रयत्न केला. परंतु मोसंबी झाडाच्या फणगडीला जाम गुंतल्याने सुटण्यासाठी सहा तास बिबट्याच्या प्रयत्न सुरू होता. वन विभागाचे कर्मचारी भूल देण्यासाठी गेले असता बिबट्याने पळ काढला होता. यात त्याचा पंज्या तुटून पडला होता. भूल पुर्ण क्षमतेने बसली नसल्याने बिबट्याने हुलकावणी देत पळ काढला होता. तेव्हापासून रात्रंदिवस अधिकारी शेतात बिबट्याचा शोध घेत होते. दोन दिवसांपासून नदीतच ठाण मांडून बसला. नदीत पाणी व पाणकणीस गवत मोठे असल्याने बिबट्या शोधण्यासाठी प्रयत्न सुरू होते. रात्री पिंजरा कार्यान्वित करून पिंजऱ्याला कॅमेरा लावून नदी परिसरात कॅमेरे लावून शोध सुरू होता.

परंतु कॅमेऱ्याच्या नजरेत येत नसल्याने ड्रोन कॅमेऱ्याने परिसरात पाहणी केली. परंतु ड्रोनच्या निदर्शनास येत नसल्याने वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी काल दुपारपासून ते सोमवारी सायंकाळपर्यंत पराकाष्ठा करीत होते. दुपारीही कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु ढाल व बचाव साहित्य असल्याने कुठली इजा झाली नाही. बिबट्याला पकडण्यासाठी औरंगाबाद येथील उपसंचालक सूर्यकांत मंकानार, सहायक वनसंरक्षक पुष्पा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वनपरिक्षेत्र अधिकारी अभय अटकळ यांनी कन्नड येथील पथक तसेच औरंगाबाद येथील शीघ्र कृती दल, नदीत भुलेचे इंजेक्शन दुपारी फेल गेले होते. नदीत पूर्ण गवत कटरच्या साह्याने काढून नदीत वाहने घालून बिबट्याची शोध मोहीम हाती घेऊन दिसता क्षणी पुन्हा भूल इंजेक्शन देऊन बेशुद्ध पडल्याने सायंकाळी बाहेर काढले. वन्यजीव अभ्यासक आदी गुडे, मनोज कांबळे, प्रकाश सूर्यवंशी, गाडगीळ तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून मेहनत घेत नदीत बसलेल्या बिबट्याला बाहेर काढले.

औरंगाबाद प्रयोगशाळेत उपचारासाठी पाठवणार
अंतरवाली सराटी परिसरात दोन दिवसांपासून नदीच्या पाण्यात जखमी बिबट्या होता. कुठे मार लागला का, तपासणीसाठी व उपचारासाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचे जिल्हा परिक्षेत्र अधिकारी अभय अटकळ यांनी या वेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...