आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ॲग्रोव्हिजनकडून खरिपाच्या तयारीबाबत धडे; वार्षिक चर्चासत्रातून गोकुळवाडीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

जाफराबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ॲग्रोव्हिजन गटशेती संघाच्या वतीने प्रत्येक महिन्यातील ९ तारखेला होणारे २०२२ वर्षातील जून महिन्याचे नियमित मासिक चर्चासत्र तालुक्यातील मौजे गोकुळवाडी येथे गुरूवारी अत्यंत उत्साहात संपन्न झाले. यावेळी नव्याने सुरू होत असलेल्या खरीप २०२२ या हंगामातील आव्हाने तसेच नियोजन यावर चर्चा करण्यात आली. तर कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी शेती या बाबत सभासदांना क्लुप्त्या देण्यात आल्या.

अॅग्रोव्हीजन ग्रुप च्या वतीने घेण्यात येणाऱ्या चर्चासत्राच्या नियमित वेळेप्रमाणे खरीप हंगाम २०२२ मधील पहिले सत्र सकाळी ११.०० ते दुपारी २.०० पर्यंत विठ्ठलसिंग दुलत यांच्या शेतावर चाललेल्या या चर्चासत्रात आंबा, सीताफळ या फळपीक शेतीसह शिवारफेरी करण्यात आली. या गावात पहिल्यांदाच झालेल्या या चर्चासत्र कार्यक्रमास कृषी सहाय्यक विनायक मेहेत्रे, ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय मोरे पाटील यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना गटशेतीचे महत्व, गटाची नोंदणी, माती परिक्षण, ॲग्रोव्हिजन गटशेती संघाच्या आदर्श सामूहिक मिश्र फळपीक लागवड, व्यवस्थापन, विक्री कौशल्य आदी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी दत्तात्रय सवडे, किशोर पंडित, किशोर जंजाळ, वैभव म्हस्के, जुगल सुलाने, अनिल दुलत, सतिश सुलाने, सुरज गुमलाडू, चतरसिंग दुलत, विजयसिंग सिंगल, ओमसिंग सुलाने, राहुल सुलाने, विठ्ठल सोनुने, रंजित सोनुने यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...