आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट:जुई प्रकल्पात वीज खंडित करण्याबाबत पत्र; जुई धरणातून होणारा पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी रोहित्रावरील वीज पुरवठा खंडीत

दानापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन शहरासह परिसरातील २० गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या जुई धरणातून होणारा पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी रोहित्रावरील वीज पुरवठा खंडीत करण्याबाबत पाटबंधारे विभागाने महावितरण कार्यालयास पत्र दिले आहे. जुई धरणातून ४५ मोटारीद्वारे रात्रंदिवस पाण्याचा अवैध उपसा होत असल्याबाबत दिव्य मराठीच्या १४ मे रोजीच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. यावर पाटबंधारे विभागाने तत्काळ दखल घेतली. जुई धरणात२७ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे प्रशासनाने हे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले आहे.

परंतु पाण्याचा अवैध उपसा करण्यावर देखील बंदी घातली होती. परंतु तरीही या धरणात तब्बल ४५ मोटारी टाकून शेतीसाठी पाण्याचा रात्रंदिवस अवैध पाणी उपसा केला जात आहे. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच त होताच पाटबंधारे विभाग खडबडून जागे होऊन महावितरण विभागाला धरण परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत करण्याबाबत पत्र दिले आहे. धरणांमध्ये रात्रंदिवस मोटारी चालत असल्यामुळे व परिसरातील रोहित्रावरचा आकडे टाकून वीज पुरवठा घेतला जात होता. मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्याने भोकरदन शहरासह परिसरातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे प्रशासनाने या धरणावर उपलब्ध असलेल्या जलसाठा पिण्यासाठी राखीव ठेवलेला आहे.

परंतु धरणातून अवैध उपसा सुरूच असल्याने पाणी पातळीत झपाट्याने घसरत आहे. या धरणात ४५ मोटारी टाकून वीज चोरी करून पाणी चोरी होत असल्याचे वृत्त प्रकाशित होताच पाटबंधारे विभागाने तातडीने पाणी चोरी थांबवण्यासाठी पाऊल उचलले आहे.

बातम्या आणखी आहेत...