आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्यात यावे‎

जालना23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील‎ जालना-बदनापूर तालुक्यातील‎ सर्व स्वातंत्र्य सैनिक व स्वातंत्र्य‎ सैनिक वारसपत्नी‎ निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे‎ प्रमाणपत्र तहसील कार्यालय‎ जालना येथील खोली क्र.११ मध्ये‎ तातडीने सादर करावेत, असे‎ आवाहन तहसीलदार श्रीकांत‎ भुजबळ यांनी केले आहे. स्वातंत्र्य‎ सैनिकांचे निवृत्तीवेतन‎ धारकांकडून ह्यातीचे प्रमाणपत्र‎ वर्षातून दोन वेळा म्हणजेच‎ जानेवारी व जुलै या महिन्यात‎ पहिल्या दिवशीच घ्यावे,‎ त्याशिवाय निवृत्ती वेतनाचे प्रदान‎ करण्यात येवू नये, असे १५ डिसेंबर‎ २०१४ रोजीच्या परिपत्रकान्वये‎ सुचित केलेले आहे.

ह्यातीचे‎ प्रमाणपत्र विलंबाने दिल्यास‎ थकबाकीसह निवृत्तीवेतन देण्यात‎ येते. स्वातंत्र सैनिक व स्वातंत्र्य‎ सैनिक वारसपत्नी‎ निवृत्तीवेतनधारकांनी विहीत वेळेत‎ हयातीचे प्रमाणपत्र तहसील‎ कार्यालय येथे सादर करणे‎ आवश्यक आहे. ह्यात प्रमाणपत्र‎ विलंबाने प्राप्त झाल्यास‎ निवृत्तीवेतन प्रदान करण्यास विलंब‎ होवू शकतो.‎

बातम्या आणखी आहेत...