आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:चांगल्या मार्गाने जीवन जगल्यास आयुष्य आनंदी; निवृत्ती महाराज यांचे प्रतिपादन

वाकडी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे लाखोंच्या संख्येत लोकांचा जीव गेला. मात्र, आपण केवळ परमेश्वराच्या कृपेने जीवंत आहोत. याचाच अर्थ आता तरी आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे चांगल्या मार्गाने जीवन जगून आयुष्याचा आनंद लुटा, असे आवाहन निवृत्ती महाराज कोरडे यांनी केले.

भोकरदन तालुक्यातील मनापुर येथे अखंड हरिनाम सप्ताहात झालेल्या किर्तणाचा कार्यक्रम ह.भ.प.निवृत्ती महाराज बोलत होते. त्यांनी ‘आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा’, या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरुपण करत संत साहित्याची आवश्यकता बोलून दाखविली. निवक महाराजांनी आपल्या निरुपणात सांगितले, की आयुष्य कसे जगावे, हे गाथा सांगते. तर आयुष्यातील समस्यांचे निवारण ज्ञानेश्वरी करते. गाथेच्या विचाराने आपण आयुष्य जगले पाहिजे. मानवी महार जीवन कोणत्या दिशेने जात आहे, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे, असे सांगितले.

संतांच्या जीवनातील वैचारिक उंची व आपली वैचारिक उंची तपासून घेऊन जीवन जगले पाहिजे. माणसं बदलली म्हणजे बुद्धी बदलते. आजची पिढी सुसंस्कृत बनवायची असेल, तर ज्ञानोबा व तुकोबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही, असेही ह.भ.प.निवृत्ती महाराज कोरडे यांनी सांगितले. यावेळी माजी सभापती एल. के. दळवी, ह.भ.पदळवी नाना, सरपंच विठोबा दळवी, ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद दळवी, अर्जुन महाराज, जगन महाराज, रामायण चार्य कोरडे महाराज, जगन महाराज, उमेश ठोंबरे, मृदंगाचार्य सुदाम महाराज, दत्तु आन्ना पंडीत महाराज, एकनाथ महाराज, देवराव महाराज, संदिप महाराज कोरडे, संदीप महाराज, अशोक महाराज, राजू महाराज शंकर जोशी, हरिनारायण दळवी यांच्यासह ग्रामस्थांची मोठी उपस्थिी हेाती. या यावेळी गावात मिरवणूक काढून गुढी उभारून निवृत्ती महाराज कोरडे यांचे कीर्तन झाले झाले. या कीर्तन कार्यक्रमासाठी गावकऱ्यांसह पंचक्रोषीतील भाविकांची उपस्थिती हेाती.

बातम्या आणखी आहेत...