आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखेडेगाव असो की शहर, श्रीमंत असो की गरीब, आज नानाविध कारणांनी लोक व्यसनांच्या आहारी गेले आहेत. याचे प्रमाण अधिक असून व्यसनाने शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य बिघडते. मनाचा संयम, जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलली की जीवन सुंदर होईल, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रकाश आंबेकर यांनी दिला.
भोकरदन तालुक्यातील उमरखेड येथे मानस फाउंडेशन, महाराष्ट्र नशाबंदी मंडळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त सहकार्याने तंबाखू सेवन विरोधी दिनी जनजागृतिपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला फाऊंडेशनच्या पदाधिकारी डॉ. सुजाता देवरे, डॉ. सुहास सदाव्रते, कवी विनोद जैतमहाल, बाबासाहेब डोंगरे, महाराष्ट्र नशाबंदी मंडळाचे अध्यक्ष बी. एस. सय्यद, शिवाजी तायडे, नंदू फुके, राजू पंडित, कृष्षा होलगे, नवनाथ फूके, मुख्याध्यापक घायाळ यांची उपस्थिती होती. डॉ. आंबेकर म्हणाले की, आज युवावर्गात मोठ्या प्रमाणावर व्यसनांचा दुष्प्रभाव पडलेला आहे.
कधी हौस-मौज म्हणून तर पार्टीसारख्या प्रकारातून हे प्रमाण वाढत आहे. व्यसनाचे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम कोणते यावर मार्गदर्शन करत डॉ. आंबेकर यांनी व्यसनापासून कसे परावृत्त झाले पाहिजे. व्यसनापासून दूर जाण्यासाठी मनाचा ठाम निश्चय, संगतगुण आणि सकारात्मक विचार जोपासणे आवश्यक असल्याचे डॉ. आंबेकर म्हणाले. डॉ. सुजाता देवरे यांनी कुटुंबातून अशा गोष्टींना थारा न देता, स्त्रीने खंबीरपणे पुढे येत असे प्रकार थांबवले पाहिजे असे आवाहन केले. नशाबंदी मंडळाचे बी. एस. सय्यद यांनी चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून व्यसनांच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकला. प्रास्ताविक डा. सुहास सदाव्रते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर झगरे यांनी केले. सतीश खरटमल यांनी आभार मानले. कार्यक्रमास उपसरपंच सागर फुके, अनुसया फूके, राजू पंडित, दीपक होलगे, कृष्णा होलगे, दिलीप होलगे, डॉ. सारंगधर फुके, शंकर फुके, विकास फुके, सोमनाथ फुके, राजू फुके, ज्ञानेश्वर होलगे, रमेश फुके, अमोल साळुंखे, दिलीप पऱ्हाड, पोलीस पाटील संतुकराव होलगे, सतीश होलगे यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.