आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची केंद्राला भेट:जिल्ह्यात1633 मतदान केंद्रांवर केली मतदार कार्डासोबत आधार कार्ड जोडणी

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली एक ऑगस्टपासून मतदार कार्डसोबत आधार कार्ड जोडणी मोहीम राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी १६३३ ठिकाणी जिल्हाभरात शिबिर घेण्यात आले. जालना शहरातील रेल्वेस्थानक ते गांधी चमन परिसरात भरणाऱ्या आठवडी बाजाराच्या अनुषंगाने नगर परिषद येथे आयोजित शिबिरास जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी भेट देऊन आवश्यक सूचना दिल्या. या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, उपविभागीय अधिकारी डॉ. संदिपान सानप यांच्यासह नायब तहसीलदार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...