आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश प्रक्रिया:एएनएम-जीएनएम प्रशिक्षणाची यादी तयार; मंजुरीनंतर प्रवेश

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा रुग्णालय परिसरातील नर्सिंग कॉलेजमध्ये जीएनएन व एएनएमच्या प्रत्येकी ४० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत असून अर्ज वाटप, स्विकृती, छाननी, मुलाखतीनंतर तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली असून मंगळवारी ही यादी अंतिम मंजुरीसाठी मुंबई येथे आरोग्य सेवा आयुक्तांकडे पाठवली जाणार आहे. यादी मंजूरी होताच प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती नर्सिंग कॉलेज व्यवस्थापनाकडून देण्यात आली.

आरोग्य सेवा संचालनालय, मुंबईकडून १९ डिसेंबर प्राप्त नोटीफिकेशननुसार १९ ते २३ डिसेंबरदरम्यान प्रवेश अर्ज विक्री तर स्विकृतीसाठी २४ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. यात जीएनएमच्या ४० जागांसाठी एकूण ३१२ अर्ज विक्री झाले होते, प्रत्यक्षात २९२ अर्ज स्वीकृत झाले तर एएनएमच्या ४० जागांसाठी ८२ अर्ज विक्री झाले होते, त्यापैकी ७१ अर्ज प्राप्त झाले.

याची छाननी करून जीएनएम व एएनएमच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांच्या २९ व ३० डिसेंबर रोजी मुलाखती घेण्यात आल्या. यातून निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली असून ती मंगळवारी (३ जानेवारी) रोजी आयुक्तालय, मुंबई येथे पाठवली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...