आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भागवत कथा श्रवण म्हणजे कलियुगात भवसागर तरणाचा मार्गे

अंबड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भागवत कथा श्रवण म्हणजे केवळ भगवंताच्या लिला नसून हे कथामृत कलियुगातील भवसागर तराणाचा मार्ग आहे. याचे कारण म्हणजे जगात एकमेव सत्य जर काही असेल तर जे भूत,भविष्य व वर्तमान या तिन्ही काळात चिरकाल टिकते ते सत्य आणि ते सत्य म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवंताचे परमात्म स्वरुप होय.या स्वरुपाची सगुण रुपातील पृथ्वी तलावरील कृष्णावतारातील लिला व त्याच्या संपूर्ण अवतार कार्याचे अमृतमय वर्णन जे भागवतात आहे त्याचे श्रवण करने अर्थात त्या सत्चिदानंद स्वरूपाशी तादात्म्य पावनेच होय, असे भागवताचार्य रामदास महाराज आचार्य यांनी सांगितले.

अंबड शहरातील चांगलेनगर येथील शिवप्रसाद चांगले यांच्या मातोश्रींच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजीत भागवत कथा सोहळयात त्यांनी निरुपन केले. वैराग्याचे मुर्त रुप असणारे शुकाचार्य यांनी आपल्या सुमधुर वाणीने राजा परिक्षीतीला या सद्ग्रंथाचे अमृतपान करविले ज्याने आपल्या जीवनाचा उद्धार करुन घेतला. श्रुंगी ऋषींच्या शापाने अवघ्या सात दिवसात मरण येणार हे कळाल्या नंतर व्यथीत झालेल्या राजाने नारदाला या शापमुक्ततेचा मार्ग विचारला त्यावार नारदांनी जीवन सार्थक करणाऱ्या भागवत कथेच्या श्रवणाचा मार्ग दाखविला यावर राजाने शुकाचार्यांच्या मुखातुन हे भागवत श्रवण करण्यास आरंभ केला. या कथामृताचे आयोजन ज्याच्याकडे होते तो पुर्वजन्मीच्या पुण्याईमुळेच हे करु शकतो.

भागवत कथा हे असे अमृततुल्य फळ आहे ज्याच्या सेवनाने आपल्या सकल पातकांचा नाश होतो. वेदरुपी वृक्षाला लागलेले हे फळ संपूर्ण वेदाचे तत्वज्ञान सांगणारे आहे यातील कथा म्हणजे जीवनातील व्यथा मिटविणा-या आहेत.प्रपंच न सोडता परमार्थ कसा करावा हा सिद्धांत सांगणारे हे कथामृत आहे. जगात कसे जगावे हे महाभारत शिकवते कसे वागावे हे रामायण शिकवते तर जीवनाच्या शेवटच्या क्षणी कसे मरावे याचे ज्ञान देणारे एकमेवाद्वितिय अमृत हे भागवत रसामृत आहे. अशा कथेचे श्रवन राजा परिक्षितीसह पुर्वी विदुराने देखील केले. आजच्या कथेत महाराजांनी समयानुकुल संस्कृत श्लोकांसह सुमधुर वाणीतील समय सूचक अशा भक्ती गितांना सादर करुन कथेतील रंगत वाढविली.

बातम्या आणखी आहेत...