आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमाज मनाची मशागत होण्यासाठी अशा मैफिलींची नितांत गरज आहे.असे नमूद करत माता, मातृभाषा व मातृभूमी समान आहेत. जागतिक ज्ञानाबरोबर यांचेही संवर्धन होत असून साहित्य हे माणसाला जगायला शिकवते, माणसे ज्ञानाने श्रीमंत व्हावीत यासाठी संगीत व साहित्याचा वारसा लाभलेल्या अंबड शहरात राजाश्रयाच्या आधारे अखिल भारतीय साहित्य संमेलन व्हावे, अशी अपेक्षा उदगीर येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कार्यवाह रामचंद्र तिरुके यांनी व्यक्त केली.
आर. पी.ग्रुप ऑफ स्कूल्स च्या वतीने महाराष्ट्र दिन व जिल्हा निर्मिती दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी अंबड येथील पंडित गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात उत्कर्ष थिएटर्स निर्मित “जागर कवितेचा “ या भाव स्पर्शी संगीत काव्यमैफलीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. बी. आर .गायकवाड तर डॉ. संजीवनी तडेगावकर, भरत भांदरगे, वंदना भांदरगे, प्रा. रवींद्र मगर यांची उपस्थिती होती. रामचंद्र तिरुके यांनी सोमनाथपूर सारख्या ग्रामपंचायत स्तरावर घेतलेल्या अ. भा. साहित्य संमेलनाविषयी माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात डॉ. बी. आर. गायकवाड यांनी अभंग, ओवी, भजन, भारूड यात जीवन अनुभूतीचे सार असून लेखक-कवींना बदलते संदर्भ काळानुरूप पकडता आले पाहिजे. पालकमंत्री राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखाली अ. भा. साहित्य संमेलन घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यांनी स्पष्ट केले.
डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी गोदा व पुर्णेकाठी केलेला जीवन प्रवास आपल्या साहित्यास “ नेणत्या बाळाच्या कुरळ्या केसांचे सौंदर्य प्राप्त व्हावं “ असे नमूद करत इंग्रजी शाळा मराठी साहित्यावर उपक्रम घेते. ही गौरवास्पद बाब असल्याचे डॉ. तडेगावकर यांनी सांगितले. प्रास्ताविकात भरत भांदरगे यांनी साहित्य, संस्कृती व इतिहास हा अनमोल ठेवा असून संस्थेत जागतिक पातळीवरील शिक्षण देण्यासोबतच अनमोल ठेव्याचे जतन करून ते वृद्धिंगत करण्यास प्राधान्य दिले जाते. असे सांगून पालकांनी कोरोना काळात विद्यार्थ्यांना टिकवून ठेवले.
हेच यशाचे गमक असल्याचे नमूद केले. सूत्रसंचालन प्रा.रवींद्र मगर यांनी तर सुमीत शर्मा यांनी आभार मानले. कार्यक्रमास चंद्रशेखर जगताप, कुसुम भांदरगे, प्राचार्या शोभा रेड्डी, पंडितराव तडेगावकर, प्राचार्य. राम रौनेकर, प्रा. दीपक राखुंडे, डॉ. विनोद जाधव, कल्याण सोळुंके, रामेश्वर त्रिमुखे यांच्यासह साहित्य रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.