आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नवउद्योजकांना 50 लाखांपर्यंत कर्ज; स्टार्टअप्स सीड फंडसाठी मॅजिक संस्था देणार मदतीचा हात

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या स्टार्टअप इंडिया सीड फंड या योजनेमध्ये मॅजिक या संस्थेचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या माध्यमातून नोंदणीकृत नवउद्योजकांना बीजभांडवलाच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे.स्टार्टअप इंडिया सीड फंड योजनेत समावेश झालेली मॅजिक मराठवाड्यातील पहिली संस्था असून देशातील स्टार्टअप इंडिया सीड फंड देणाऱ्या निवडक इन्क्युबेटरमध्ये मॅजिक संस्थेचा समावेश झाला आहे.

स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना स्टार्टअप्सना संकल्पनेच्या पुराव्यासाठी, प्रोटोटाइप विकसित करण्यासाठी, उत्पादनाच्या चाचण्या घेण्यासाठी, बाजारपेठेत प्रवेश आणि शाश्वत व्यवसायात रूपांतर करण्यासाठी आर्थिक साहाय्य प्रदान करणार आहे. या समितीचे अध्यक्ष मुकुंद भोगले यांनी सांगितले की, केंद्र सरकारने नवउद्योजकांसाठी सीड फंड योजना सुरू केली असून देशातील निवडक इन्क्युबेटरच्या माध्यमातून निधी स्टार्टअप्सना दिला जातो. मराठवाड्यातील स्टार्टअप्स मॅजिकच्या माध्यमातून अर्ज करू शकतील.

नवउद्योजकांनी लाभ घ्यावा
स्टार्टअप्सच्या बाबतीत जगातील पहिल्या तीन देशांत भारताचा समावेश झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये औरंगाबाद, जालना आणि मराठवाडा विभागातून अनेक स्टार्टअप्सनी मोठ्या प्रमाणावर यश संपादन केले आहे. या नवउद्योजकांना आपला व्यवसायात प्रगती करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरू शकते. विभागातील जास्तीत जास्त नवउद्योजकांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन मॅजिकचे संचालक सुनील रायठठ्ठा यांनी केले आहे.

यांना अर्ज करता येईल
स्टार्टअप डीपीआयआयटीकडून मान्यताप्राप्त असावे, सुरुवात दोन वर्षांपेक्षा आधी सुरू झालेली नसावी, प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसच्या विकासासाठी बिझनेस आयडिया असावी, आपल्या कोअर प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस किंवा बिझनेस, जल व्यवस्थापन, शिक्षण, कृषी, बायोटेक्नोलॉजी, हेल्थ केअर, ऊर्जा, मोबिलिटी, डिफेन्स, स्पेस, रेल्वे, तेल, गॅस, टेक्स्टाइल आदी क्षेत्रांत नावीन्यपूर्ण उपाय प्रदान करणाऱ्या स्टार्टअप्सना निधी मिळण्यासाठी प्राधान्य असेल.

बातम्या आणखी आहेत...