आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणे आंदोलन:स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नये

जालना4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणा शिवाय घेण्यात येवू नये. याविषयी वेळोवेळी मागणी देखील करण्यात आली आहे. परंतू निवडणुका तोंडावर आल्या असतांना देखील ओबीसींना न्याय मिळत नाही ही चिंतेची बाबत असल्यामुळे ओबीसी व्हि.जे एन. टी. बहुजन परिषदेच्या वतीने २४ जून शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा अधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष कल्याण दळे यांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणा शिवाय झाल्यास राज्यातील ओबीसी समाजावर मोठा न्याय होईल केंद्र आणि राज्य शासनाने याची गार्भीयाने दखल घ्वावी. नसता ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्यशिवाय राहणार नाही असे दळे यांनी सांगितले आहे. आडनावाच्या आधारे इतर मागास प्रवर्गाचा (ओबीसी) इम्पीरिकल डाटा गोळा करण्याचे काम जयंतकुमार बांठीया आयोगामार्फत सुरु आहे. यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी आदि मागण्यासाठी २४ जून रोजी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी, व्हि. जे. एन. टी. बहुजन परिषदेच्या वतीने जालना जिल्ह्यातील ओबीसी समाज धरणे आंदोलन करणार आहे.

या आंदोलनामध्ये आमदार राजेश राठोड, लक्ष्मण वडले, शबीर अन्सारी, राजेंद्र राख, संत्सग मुंढे, दत्तात्रय चेचर, शेख महेमूद, डॉ. विशाल धानूरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार असून यावेळी हे मान्यावर ओबीसी समाजाच्या प्रशांनासाठी मार्गदर्शन करणार आहेत. राजकीय क्षेत्रासाठी महत्वाच्या असलेल्या या प्रश्नासाठी सर्वांनी एकजून होत हक्काच्या बाबीसाठी पुढे येण्याची गरज आहे. दरम्यान, या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थितीत राहवे असे आवाहन सुंदरलाल बगीनवाल, भागवत राऊत, ज्ञानेश्वर मानवतकर, निलेश दळे, नंदाताई पवार, बाबासाहेब सोनूने, विठ्ठल गिराम, सय्यद करीम ब्लिडर, अब्दुल रफिक मोमिन, फकीरा वाघ, गणेश चांदोडे आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...